5 कोटींची मागणी का केली? सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीचा मोठा खुलासा

सलमान खानला सतत लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा वाहतूक नियंत्रण कक्षाला जीवे मारण्याचा मेसेज आला आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 8, 2024, 12:29 PM IST
5 कोटींची मागणी का केली? सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीचा मोठा खुलासा title=

Salman Khan Death Threat: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गेल्या अनेक दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यासोबतच सलमान खानकडे 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरु केली. भिकाराम बिश्नोईने या चौकशीमध्ये मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये आरोपीने म्हटलं आहे की, लॉरेन्स बिश्नोई माझा आदर्श व्यक्ती आहे. 

'लॉरेन्स बिश्नोईचा मला अभिमान'

रिपोर्टनुसार, आरोपी भिकारामने वरळी पोलिसांच्या चौकशीमध्ये मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये आरोपीने सलमान खानला 5 कोटींची खंडणी का मागितली याचा खुलासा केला आहे. ज्यामध्ये आरोपी भिकाराम म्हणाला की, सलमान खानकडून 5 कोटी रुपये घेऊन तो बिश्नोई समाज का मंदिर बांधणार होता. त्यासाठी त्याने सलमान खानला 5 कोटींची खंडणी मागितली होती. वरळी पोलिसांच्या चौकशीमध्ये असे समोर आले आहे की, भिकाराम हा सतत लॉरेन्स बिश्नोईचे व्हिडीओ बघत होता. लॉरेन्स बिश्नोई जेलमध्ये राहून जे काय करत आहे त्याचा भिकारामला अभिमान असल्याचं देखील त्याने सांगितले. 

'बिश्नोई समाजासाठी जेलमध्ये जातोय'

चौकशीमध्ये आरोपीने सांगितले की, सलमान खानने जे काही केले आहे, त्यानंतर देखील त्याने कधी माफी मागितली नाही. ज्यामध्ये त्याने रोडवरती असणाऱ्या लोकांवर गाडी घातलेली असो, लॉरेन्स बिश्नोई जे काही करत आहे, ते सर्व बरोबर आहे. मला जेलमध्ये जाण्यासाठी काहीच अडचण नाही. मी बिश्नोई समाजासाठी जेलमध्ये जात आहे, असं आरोपी भिकाराम बिश्नोईने चौकशीमध्ये म्हटलं आहे. 

पुन्हा एकदा सलमान खानला धमकी

पुन्हा एकदा सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आली आहे. रिपोर्टनुसार, मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला गुरुवारी रात्री 12 वाजता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आला आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईवर गाणे लिहिणाऱ्याला सोडले जाणार नाही. या व्यक्तीला महिनाभरात मारले जाईल, अशी धमकीही या मेसेजमध्ये दिली आहे.