'आयुष्यातील सर्वात उत्तम व्यक्तीला मी भेटले', भाऊ कदमच्या लेकीला भेटला 'तो'

Chala Hawa Yeu Dya Show : आपल्या विनोदाने सर्वांना हसायला लावणारा विनोदवीर भाऊ कदम कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. भाऊ कदम सध्या लेकीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.   

Updated: Dec 8, 2022, 04:33 PM IST
'आयुष्यातील सर्वात उत्तम व्यक्तीला मी भेटले', भाऊ कदमच्या लेकीला भेटला 'तो' title=

Ranveer Singh at Chala Hawa Yeu Dya Show : आपल्या विनोदाने सर्वांना हसायला लावणारा विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आपल्या सेलिब्रिटीच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. आता भाऊ कदमच्या लेकीबद्दल मोठी बातमी समोर येत आहेत. भाऊ कदमची मुलगी मृण्मयी (Mrunmayee) सध्या चर्चेत आहे. भाऊ कदमच्या लेकीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने आपली इच्छ पूर्ण झाल्यानंतर भावना व्यक्त केली.

मृण्मयीने नुकताच झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) लोकप्रिय कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी मृण्मयी वडिलांसाठी नाहीतर एका खास व्यक्तीसाठी कार्यक्रमात आली होती. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता रणवीर सिंग आहे. रणवीर सिंगसोबत (ranbir singh ) मृण्मयीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये मृण्मयी रणवीरसोबत सेल्फी काढताना दिसत आहे. शिवाय रणवीरने मृण्मयीसोबत गप्पा देखील मारल्या. रणवीरसोबत खास व्हिडीओ शेअर करत मृण्मयीने आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. (ranbir singh at Chala Hawa Yeu Dya )

मृण्मयी व्हिडीओ पोस्ट करत म्हणते, 'माझं स्वप्न अखेर सत्य झालं. रणवीरकडे खूप काही शिकण्यासारखं आहे. तो फक्त एक अभिनेता नाहीतर एक व्यक्ती म्हणून देखील उत्तम आहे. माझ्या आयुष्यात सर्वात खास व्यक्तीला मी भेटली. ही भेट माझ्या वडिलांमुळेच शक्य झाली. ही गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही...' मृण्मयीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Mrunmayee kadam social media)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, 'चला हवा येऊ द्या' कार्यमात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी येत असतात. रणवीर देखील त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'चला हवा येऊ द्या' कार्यमात आला होता. रणवीर सिंग स्टारर 'सर्कस' सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.