बादशाहनं पहिल्यांदाच दाखवला लेकीचा VIDEO; 7 वर्षांच्या जेसीमीचा रॅप पाहून सगळेच आश्चर्यचकित

Badshah Daughter Jessemy : रॅपर बादशाहनं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 19, 2024, 02:08 PM IST
बादशाहनं पहिल्यांदाच दाखवला लेकीचा VIDEO; 7 वर्षांच्या जेसीमीचा रॅप पाहून सगळेच आश्चर्यचकित title=
(Photo Credit : Social Media)

Badshah Daughter Jessemy : भारतीय रॅपर बादशाह कामा व्यतिरिक्त संपूर्ण वेळ हा त्याचं कुटुंब आणि मुलांना देतो. सध्या रॅपर त्याच्या आयुष्यातील कठीण काळातून जात आहे. तरी देखील बादशाहनं काही दिवसांपूर्वी त्याची पूर्वाश्रमीची पत्नी जॅस्मीन मसीहसोबत त्याच्या नात्याविषयी चर्चा केली होती आणि सांगितलं होतं की ते दोघं त्यांची लेक जेसीमीला कसं सांभाळत आहेत. आता त्यानं त्याच्या पत्नीची एक झलक दाखवली आहे. ज्यात जेसीमी ही बादशाह अर्थात तिच्या वडिलाप्रमाणे रॅप करताना दिसते. 

बादशाहची लेक जेसेमी खूप क्यूट आहे. रॅपरनं त्याच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर त्याची लेक जेसीमीसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या क्लिपमध्ये असलेली त्याची लेक जेसीमी खूप सुंदर दिसत आहे. तिनं काळ्या रंगाचं स्वेटशर्ट परिधान केलं होतं. हेडबॅंड लावलेला असून तिनं वेण्या घातल्या आहेत. त्यामुळे तिचा लूक आणखी खुलून दिसतोय. या व्हिडीओत जेसीमीचा स्वॅग पाहायला मिळत आहे. छोटी मुलगी किती सुंदर पद्धतीनं रॅप करते आणि ती म्हणते की 'ही तुमची मुलगी आहे, जेसेमी आणि तुम्ही मला युट्यूबवर पाहत आहात.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, एका पॉडकास्टमध्ये बादशाहनं त्याची लेक जेसीमीसोबत त्याचं नातं कसं आहे ते सांगितलं  होतं. त्यानं सांगितलं होतं की 'ती मन मिळावू आहे आणि विचार करते की तिचे वडील खूप चांगले आहेत.' बादशाहनं पुढे सांगितलं की 'त्याच्या लेकीनं त्याला स्टेजवर लाईव्ह परफॉर्म करताना पाहिलंय. पण ती त्याच्या कामाची फॅन नाही. बादशाहनं सांगितलं की ती माझ्या कॉन्सर्टमध्ये होती. ती म्हणते की माझे वडील चांगले आहेत. तू खूप जास्त चांगले आहेत. पण ती फॅन नाही. तिला ब्लॅकपिंक ऐकायला आवडतं. एक संगीतकार असल्यामुळे आपल्या मुलांसाठी दुसऱ्या कोणत्या संगीतकाराच्या गोष्टी खरेदी करणं खूप वाईट वाटतं. तेव्हा खूप त्रास होतो.' 

हेही वाचा : 'आम्ही माफी का मागू, काळवीटाची शिकार झाली तेव्हा सलमान तिथे नव्हताच'; सलीम खान यांचा खुलासा

या आधी 'एमटीवी हसल 03' या कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये बादशाहनं काही भावनिक गोष्टी सांगितल्या होत्या. हे सगळं तेव्हा सुरु झालं जेव्हा एक स्पर्धक शेन बीनं त्याची आई, लेक आणि पत्नीसोबत महिलांसाठी एक गाणं डेडिकेट केलं होतं. गाण्यामुळे बादशाह लगेच भावूक झाला होता आणि त्यानं लेक असल्याचा आनंद व्यक्त केला होता.  त्यानं सांगितलं होतं की त्याची लेक 6 वर्षांची आहे. तेव्हा त्यानं खुलासा केला की जेव्हा तो वडील झाला होता तेव्हा त्याला कोणत्याच गोष्टीची जाणीव झाली नव्हती. मात्र, जेव्हा तिनं पहिल्यांदा जेव्हा त्याचा हात पकडला तेव्हा त्याच्या भावना सगळ्या बाहेर निघाल्या.