मुंबई : दिल्लीमध्ये प्रदुषित हवा आणि धुकं यामुळे 'स्मॉग' तयार झालं आहे. स्मॉग म्हणजेच धुरक्यामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वातावरणात प्रदुषणाचा वाढता विळखा थेट लोकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे.तसेच स्प्ष्ट दिसअत नसल्याने रस्त्यावर अपघात होण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे.
दिल्लीत हिवाळ्याच्या दिवसात हमखास दिसणारी ही परिस्थिती गंभीर असून त्यावर अनेक उपाय सुचवले जात आहेत. अभिनेता आयुषमान खुराना यानेदेखील यामध्ये खारीचा वाटा उचलला आहे.
This! #smog #smogcutter pic.twitter.com/47FvKJCoqx
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) November 11, 2017
really ? .. need to get one of these https://t.co/cWFpXMDSxS
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 12, 2017
बीजिंगमध्ये 'स्मॉग'च्या समस्येवर उपाय म्हणून 'स्मॉग कटर' हा उपाय सुचवण्यात आला आहे. त्यामुळे वातावरणातील प्रदुषित हवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आयुषमान खुरानाने यंत्राबाबतचा एक व्हिडियो ट्विटरवर शेअर केला आहे.
स्मॉग कटर कशाप्रकारे काम करतं हे पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. बीग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनीदेखील 'या उपायाची आपल्याला गरज आहे.' अशा आशयाचे ट्विट केले आहे.