नवी दिल्ली : सोशल मीडिया अनेक बाबतीत चांगली आहे मात्र, याचे काही दुष्परिणामही आहेत. खासकरून टीका करणारे जाणून बूजून एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला टार्गेट करतात. इतकेच नाही तर कमेंट करताना हद्द पार करतात.
नुकतचं अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबतही असाच काहीसा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. अर्जुन कपूरच्या एका फोटोवर इशिका रॉयच्या ट्विटर अकाऊंट @Ishikarai0 वरुन कमेंट केलं आहे की, रेपिस्ट सारखा दिसतो. इतकचं नाही तर इशिका रॉय नावाच्या या ट्विटर युजरने अर्जुन कपूरला गुन्हेगार आणि नकारात्मक ऊर्जा असलेला व्यक्ती असं संबोधलं आहे.
ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "अर्जुन कपूर किती घाणेरडा दिसतो. अर्जुन एक रेपिस्ट आणि गुन्हेगार सारख्या नेगेटिव्ह वाइब्स मिळतात. जेवढ्या लवकर होईल तितक्या लवकर अर्जुनने बॉलिवूडपासून दूर झालं पाहिजे, म्हणजेच बॉलिवूडला एक फ्रेश आणि नवं टॅलेंट मिळू शकेल."
This is an all time low at trolling I feel...a woman, a girl shamelssly and causally using the term rapist isn’t trolling it’s saddening... https://t.co/AkcbhkHtOs
— Arjun Kapoor (@arjunk26) October 6, 2017
मुलीच्या या कमेंटवर अभिनेता अर्जुन कपूरने आपल्यावर संयम ठेवला आणि आपल्या पद्धतीने उत्तर दिलं. "ट्रोलिंगवर मी जास्त लक्ष देत नाही. एक महिला, एक मुलगी रेपिस्ट शब्दाचा वापर करत आहे. हे ट्रोलिंग नाही तर हे खूपच दुख:द आहे."
गेल्या काही वर्षांपासून सेलिब्रेटींना ट्रोल करण्याच्या घटना वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. मल्लिका शेरावतच्या हॉट फोटोशूटवर ट्रोल करणाऱ्यांनी लिहीलं होतं की ती आंटीसारखी दिसते.
दरम्यान, अभिनेता अर्जुन हा परिणितीसोबत 'संदीप' आणि पिंकी फरार' आणि 'नमस्ते कॅनडा' या सिनेमात एकत्र पहायला मिळणार आहे. याच दोन्ही सिनेमांमुळे सध्या अर्जुन कपूर चर्चेत आहे.