मुंबई : विविध मुद्द्यांवर आपली रोखठोर मतं मांडणाऱ्या ज्येष्ठ गीतकार यांनी पुन्हा एकदा त्यांच्या शैलीत नास्तिकपणाच्या मुद्द्यावरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशव्यापी प्रकरण असो किंवा मग राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडी. प्रत्येक विषयावर अख्तर त्यांची मतं मांडत असतात. आजुबाजूला घडणाऱ्या प्रसंगांवर व्यक्तही होत असतात. यावेळी मात्र व्यक्त होत असताना त्यांच्या शब्दांना चांगलीच धार आल्याचं पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर एका नेटकऱ्याच्या ट्विटला उत्तर देताना अख्तर यांनी त्याच्यापुढे असे काही दाखले दिले की त्यावर तो नेटकरी निरुत्तरच झाला. काही दिवसांपूर्वीच अख्तर यांनी एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी 'मी नास्तिक असलो तरीही बंगळुरुजवळ लावण्यात आलेला येशू ख्रिस्तांचा एक पुतळा क्रेनच्या सहाय्याने काढला जात असताना माझी मान शरमेनं खाली गेली. पोलीसांकडून हे काम करण्यात आलं. ते सरकारच्या आदेशाचं पालन करत होते', असं लिहिलं होतं.
अख्तर यांच्या या ट्विटला निशाणा साधत एका युजरने त्यांना टोला लगावला. नास्तिक होण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. 'जिन्ना अगदजी योग्य तेच म्हणायचे. तुम्ही एकनिष्ठपणा सिद्ध करण्यातच उर्वरित आयुष्य व्यतीत करणार आहात', असं ट्विट त्याने केलं. ज्यामध्ये पाकिस्तान सैन्य आणि आयएसआय झिंदाबाद असं लिहिण्यात आलं होतं. याच टिवटिवीला अख्तर यांनी उपरोधिक शैलीत उत्तर दिलं.
'प्रिय याकूब... तुध्या कैद-ए-आझमना माझ्या नास्तिक असण्याशी काहीच अडचण नसती जशी तुला आहे. कारण अखेर ते स्वत:सुद्धा डुक्कर (डुक्कराचं मटण) खाणारे, व्हिस्की पिणारे पाश्चात्य शैलीने जगणारे एक जंटलमॅन होते, ज्यांचा जन्मच फक्त शिया मुसलमानांमध्ये झाला होता. बरं पाकिस्तानमध्ये शियांना आजही मुसलमान म्हणून गणलं जातं ना...?', असं ट्विट अख्तर यांनी केलं.
जावेद अख्तर यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर आता त्यावर विश्वासच बसत नसल्याची प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली आहे. मुख्य म्हणजे काहींनी आता शिया मुसलमानच आहेत, अशी प्रतिक्रिया देत एका नव्याच मुद्द्याला वाचा फोडली आहे.