मुंबई : अॅमेझॉन प्राइमच्या 'क्रॅश कोर्स' या वेब सीरिजमध्ये दिसलेली अभिनेत्री अनुष्का कौशिकनं अभिनय क्षेत्रात नाव कमावलं आहे. अनुष्का ही मुळची उत्तर प्रदेशची आहे. अनुष्का अनेक ओटीटी शोमध्ये दिसली आहे. अनिल कपूर यांच्या 'थार' (Thar) या चित्रपटातही तिनं उत्तम काम केलं होतं. आता एका मुलाखतीत अनुष्कानं कास्टिंग काउचशी संबंधित एक जुनी घटना शेअर केली आहे.
ही घटना अनुष्कानं जेव्हा तिच्या करिअरला सुरुवात केली तेव्हाची आहे. अनुष्का सांगते की ती आणि तिची आई एका नातेवाईकाशी बोलत होते. यादरम्यान तिच्या आईने नातेवाईकाला सांगितले की अनुष्का अभिनय क्षेत्रात कशी आली, तर यावर ते नातेवाईक तिच्याशी कास्टिंग काउचबद्दल बोलू लागले, त्यानंतर अनुष्का आणि तिची आई दोघींनाही लाज वाटली.
अनुष्का कौशिक म्हणते, 'काका म्हणाले, चित्रपटसृष्टी! मुलींची तर ही अवस्था होते. इंडस्ट्री मुलींसाठी कशी चांगली नाही हे सांगू लागले आणि कास्टिंग काउचबद्दलही बोलले. माझ्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव मला अजूनही आठवतात. ती उदास झाली होती. आपली मुलगी असे काही करणार नाही, असेही तिनं त्या लोकांना सांगितलं होतं. तिला खरंच मला साथ द्यायची होती. पण त्यांचं जग वेगळ आहे.'
ती पुढे म्हणाली, 'आज माझं जग बदलल असले तरी, पण ती आजही त्याच जगात वावरत आहे. माझ्या आईनं लोकांना सांगणं बंद केलं की तिची मुलगी अभिनेत्री आहे. तिला लाज वाटते आणि त्या घटनेचा माझ्यावर मोठा परिणाम झाला.'
आता अनुष्काने इंडस्ट्रीत स्वतःचं नाव कमावलं आहे, तिच्या आईला तिचा अभिमान आहे. याबद्दल सांगित अनुष्का म्हणाली की, 'जेव्हा लोक माझ्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येतात, तेव्हा ती माझ्यापेक्षा जास्त उत्साहित आणि आनंदी होते. तिला प्रसिद्धीचे हे क्षण आवडतात, ती एन्जॉय करते.' अनुष्कानं 'महाराणी', 'क्रॅश कोर्स', 'घर वापसी' आणि 'बॉईज हॉस्टेल' या वेबसिरीजमध्ये काम केले आहे.