Rekha च्या खास अंदाजात दिसली Ankita Lokhande

अंकिताचा नव्या मोहक अदा 

Updated: Feb 1, 2021, 03:46 PM IST
Rekha च्या खास अंदाजात दिसली Ankita Lokhande

मुंबई : टीव्ही आणि बॉलिवूडची अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)  सोशल मीडियावर ऍक्टीव असते. तिने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये अंकिताचं एक वेगळंच रुप पाहायला मिळत आहे. रेखाच्या गाण्यावर अंकिताचा खास अंदाज पाहायला मिळत आहे. 

रेखाच्या गाण्यावर अंकिताच्या मोहक अदा 

अंकिता लोखंडेने बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रेखा यांच्या गाण्यावर आपला सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अंकिता रेखा यांच्या 'तेरे बिना जिया जाए ना' हे गाणं गाताना दिसत आहे. या व्हिडिओत ती सुशांतला नाही तर तिचा होणारा नवरा विक्की जैन करता गायलं आहे. पण चाहत्यांना हे गाणं सुशांतकरता गायलं असल्याचं वाटत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

असा दिसतोय अंकिताचा लूक 

अंकिता लोखंडेने लाल रंगाचा सूट घातला आहे. तसेच लाल रंगाची टिकली लावली आहे. या व्हिडिओत अंकिता मोकळ्या केसांनी दिसत आहे. अंकिता व्हिडिओत आपल्या केसांशी खेळताना दिसत आहे. रेखा यांच्या गाण्यावर अंकिता लिपसिंक करत आहे. व्हिडिओत अंकिता अतिशय सुंदर दिसत आहे. 

अंकिताने शेअर केले सुशांतचे फोटो 

अंकिता लोखंडेने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने सुशांत आणि सुशांतच्या कुटुंबियांचे फोटो शेअर केले आहेत. सुशांतच्या वाढदिवसादिवशी दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. ती कायमच सुशांतच्या आठवणी शेअर करत असते.