लग्नाआधीच अंकिता लोखंडेकडून Good News; फोटो पाहून म्हणाल...

चाहत्यांनीही व्यक्त केलं कुतूहल 

Updated: Oct 13, 2021, 11:08 AM IST
लग्नाआधीच अंकिता लोखंडेकडून Good News; फोटो पाहून म्हणाल...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे हिनं मालिका विश्वातून आपल्या कारकिर्दीदरम्यान, कायमस्वरुपी ओळख मिळवली. बॉलिवूड चित्रपटांतूनही तिनं आपली छाप सोडली. अंकिताची कारकिर्द जितकी लक्षवेधी आणि बहुचर्चित ठरली, त्याचप्रमाणे तिच्या खासगी आयुष्याबाबतही अनेकदा चाहत्यांनी कुतूहल व्यक्त केलं. 

भूतकाळ मागे सारत अंकिता खासगी आयुष्यात बरीच पुढे आली. ज्यानंतर तिनं विकी जैन याच्यासोबतच्या आपल्या नात्याचा खुलेपणानं स्वीकार केला. येत्य़ा काळात अंकिता आणि विकी लग्नबंधनात अडकणार असल्याचं अनेकांचंच म्हणणं आहे. किंबहुना त्यासाठीची तयारीही सुरु झाली आहे. 

 

खुद्द अंकितानंच शेअर केलेली एक आनंददायी पोस्ट याच दिशेकडे खुणावत आहे. अंकितानं नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका घराचा फोटो पोस्ट केला आहे. जिथं घराच्य़ा नुतनीकरणाचं काम सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या घरात ती एक नवी सुरुवात करणार आहे. तिनं शेअर केलेली ही गुड न्यूज येत्या काळात विकीसोबतच्या तिच्या विवाह चर्चांना आणखी वाव देऊन जात आहे. तेव्हा आता घराच्या शुभेच्छा देण्यासोबतच लग्नाची तारीख केव्हा ऐकवणार? असेच प्रश्न चाहत्यांनी अंकिताला उद्देशून विचारले आहेत.