ब्राऊन बिकीनीमध्ये सुपर मॉडेलचं सनबाथ... फोटो व्हायरल

ती तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या फॅशनचीही चर्चा जोरात असते. 

Updated: Aug 17, 2022, 10:07 PM IST
ब्राऊन बिकीनीमध्ये सुपर मॉडेलचं सनबाथ... फोटो व्हायरल title=

Kendell Jenner: सुप्रसिद्ध अमेरिकन मॉडेल केंडल जेनर सध्या आपली सुट्टी एन्जॉय करताना दिसते आहे. नुकतेच तिने आपल्या समर वेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. तरूणांच्या मनावर केंडलने अक्षरक्ष: अधिराज्य गाजवले आहे. ती तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या फॅशनचीही चर्चा जोरात असते. 

कुठल्याही फॅशन शोमध्ये म्हणा ती तिच्या फॅशन सेन्सने सगळ्यांची मनं जिंकून घेते. सध्या तिने शेअर केलेल्या इन्स्टा पोस्टमध्ये तिने ब्राऊन बिकीनी घातली आहे आणि त्यात लुकमध्ये ती समर सिझनचा पुरेपुर आनंद लुटताना दिसते आहे. 

केंडल जेनर नेहमीच स्टायलिश असते.  मंगळवारी दुपारी ब्राऊन बिकिनीमध्ये केंडल सनबाथ एन्जॉय करताना दिसली. या फोटोत ती तिच्या पेट डॉगसोबत दिसते आहे. सुर्यप्रकाशात ती बीचच्या जवळ बसली आहे आणि आपल्या डोक्यावर घातलेली टोपी तिने थोडी खाली वाकवली आहे आणि त्याच पोजमध्ये ती खाली वाकून बसली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लहान पट्ट्यांसह ब्राऊन बिकिनीमध्ये तिने तिची बॉडी रिवील केली आहे.