करण जोहरचं मोठं विधान; लग्नाआधीच प्रेग्नंट होती आलिया भट्ट?

ग्नाच्या 2 महिन्यांनंतरच आलिया भट्टने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. 

Updated: Jul 9, 2022, 06:35 PM IST
 करण जोहरचं मोठं विधान; लग्नाआधीच प्रेग्नंट होती आलिया भट्ट? title=

मुंबई : लग्नाच्या 2 महिन्यांनंतरच आलिया भट्टने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतरच अभिनेत्रीने हॉस्पिटलमधून सोनोग्राफी करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. अशात आलियाचे सोनोग्राफीचे फोटो व्हायरल होताच सर्वांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, आलिया लग्नापूर्वी प्रेग्नंट होती का, असा विचारही काही लोकांच्या मनात आला. याचं कारण म्हणजे आलियाची सोनोग्राफी करतानाचा व्हायरल झालेला फोटो. कारण सहसा सोनोग्राफी गर्भधारणेचे तीन महिने पूर्ण झाल्यानंतरच केली जाते. त्यानंतर या बातम्यांनी अधिकच जोर धरला. दरम्यान, आलियाने 'कॉफी विथ करण'मध्ये असं सांगितलं त्यानंतर लोकांची ही भीती अधिकच जोर धरू लागली आहे.

याचे संकेत करण जोहरच्या चॅट शोमध्ये पाहायला मिळाले
करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण' च्या सीझन 7 मध्ये आलियाने सांगितलं की, तिच्या लग्नाची बातमी ऐकून करण जोहर भावूक झाला. आलिया शोमध्ये म्हणाली, 'जेव्हा मी करण जोहरला माझ्या लग्नाबद्दल सांगायला गेले होते, तेव्हा त्याचे केस खराब झाले होते. तो टोपी घालून खूप अस्वस्थ होता आणि खुर्चीत बसला होता.

मी त्याला सगळं काही सांगितलं, की मी लग्न करणार आहे. त्यावेळी करणच्या हातात कॉफीचा मग होता आणि तो रडू लागला. रडत फक्त एवढंच म्हणाली की मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. विशेष म्हणजे हे सगळं सांगताना आलियाने करण जोहरच्या शोमध्ये एक्टिंग करत सांगितलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करणकडून आलियाची पोल उघड
करण जोहरचा चॅट शो ऑन एअर होण्यापूर्वी आलियाने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. त्याच बरोबर दिलेल्या एका मुलाखतीत आलियाच्या या बातमीवर प्रतिक्रिया व्यक्त करत करणने सांगितलं की, 'हे जाणून मी रडायला लागलो. ती माझ्या ऑफिसमध्ये आली, मला आठवतंय त्यावेळी माझे केस खराब झाले होते. मी टोपीसह हुडी घातली होती. आलियाने सांगितल्यावर मी भावूक झालो. माझे अश्रू थांबत नव्हते. मग मी आलियाला मिठी मारली. माझं बाळाला बाळ होणार आहे यावर माझा अजिबात विश्वास बसत नव्हता. करणच्या या वक्तव्यानंतर सगळीकडे एकच चर्चा रंगताना दिसत आहे.