Saba Khan : सध्या झायरा वसीम ही चर्चेत आहे. तिनं नुकताच बुर्ख्यात जेवताना एका महिलेचा फोटो शेअर केला आणि त्यावर तिनं सांगितलं की ते तिनं निवडलं आहे. झायरा वसीम नाही तर तिच्यासोबत सना खाननं देखील बॉलिवूडला रामराम करत इस्लाम स्वीकारला. त्यांच्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीनं अभिनय क्षेत्राला रामराम करत इस्लाम धर्म स्विकारला आहे. ही एक भोजपुरी अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव सबा खान असे आहे. सबानं ग्लॅमरचं विश्व सोडतं विवाह केला आहे. विवाहच्या आधी होणाऱ्या कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सबा खाननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोत सबानं लेहेंगा परिधान केला असून डोक्यावर एक चुनर घेतली आहे. या चुनरचा रंग हिरवा असून त्यावर उर्दू भाषेत कुबूल है कुबूल है लिहिले आहे. तर सबानं हे सगळं तिच्या विवाहच्या आधी असलेल्या कार्यक्रमांसाठी आहे. तर सबानं सिल्वर रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. तर तिचा डायमंड नेकलेस सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. हे फोटो शेअर करत सबानं कॅप्शन दिलं की 'अहमदुल्लाह.'
सबानं त्या आधी तिच्या मेहंदी आणि हळदीच्या कार्यक्रमातील फोटो देखील शेअर केले होते. सबानं हे फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर फक्त व्हायरल झाले नाही तर चर्चेचा विषय देखील ठरले. त्याचं कारण म्हणजे सबानं त्यानंतर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्या. काही दिवसांपूर्वी सबानं सगळे फोटो डिलीट करत हिजाब परिधान केलेला एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला पाहून अनेकांना प्रश्न पडले होते आणि त्यांनी थेट तिला ते प्रश्न विचारले. काही नेटकऱ्यांनी तिला विचारलं की तुझ्यावर कोणी काही प्रेशर टाकलं का आणि अभिनय सोडायचं काय कारण आहे. पण सबानं कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा : लेकीनं असं काय केलं की, Manoj Bajpayee म्हणाले 'माझ्यासाठी हे लज्जास्पद'
दरम्यान, तिच्या विवाहाच्या बातमीनंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सबानं विवाह केला हे सगळ्यांना कळलं असलं तरी देखील तिनं कोणाशी विवाह केला हे काही कोणाला ठावूक नाही. पण तुम्हाला माहितीये का? सबानं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की अभिनय क्षेत्रात तिला यशस्वी व्हायचे होते आणि इथपर्यंत येण्यासाठी तिनं घरच्यांशी भांडण केलं होतं पण आता तिनं विवाह करत इस्लाम धर्म स्वीकारला आहे.