टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; बिघडली अभिनेत्याची तब्येत

अभिनेत्याचा नवीन व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

Updated: Oct 3, 2022, 06:14 PM IST
टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; बिघडली अभिनेत्याची तब्येत title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेस आणि अॅक्शनद्वारे तरुणांना प्रेरित करतो. मात्र याच दरम्यान अभिनेत्याचा नवीन व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. अभिनेता सोफ्यावर बसून डॉक्टरांकडून तपासणी करुन घेताना दिसत आहे.

टायगर श्रॉफची ब्लड प्रेशर चाचणी झाली
टायगर श्रॉफने त्याचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट अपडेट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो कोणताही स्टंट किंवा वर्कआउट करताना दिसत नसून त्याची ब्लडप्रेशर टेस्ट करताना दिसत आहे. अभिनेत्याची ही क्लिप व्हायरल होताच चाहत्यांची चिंता मात्र वाढली आहे.

चाहत्यांचा ताण वाढला
त्याचा व्हिडिओ शेअर करत टायगर श्रॉफने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'अॅक्शन हिरोच्या आयुष्यात फक्त एक दिवस बाकी आहे.' जगात 2 लाख 88 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले, 'सर तुम्ही लवकर बरे व्हा.' दुसऱ्याने लिहिलं, 'तुम्हाला काय झालं.' तर अजून एकाने कमेंट करत लिहिलं की, 'सर तुम्ही खूप मेहनती आहात.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टायगर श्रॉफचं वर्कफ्रंट
टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत. हा अभिनेता लवकरच 'गणपत' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन असणार आहे. याशिवाय तो बागी 4 आणि रॅम्बोमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर, या वर्षाच्या अखेरीस, अभिनेता अक्षय कुमारसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.