Rozlyn Khan Slams Ankita Lokhande : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान जेव्हा स्टेज 3 च्या ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करत होती त्यावेळी अभिनेत्री रोजलिन खाननं हिना खानवर आरोग लगावले होते. स्वत: स्टेज 4 कॅन्सर पीडित असलेल्या अभिनेत्रीनं हिनावर स्वत: ची पब्लिसीटी करण्यासाठी कॅन्सर झाल्याचं खोटं नाटक केल्याचं म्हटलं. आता हिना खानला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या अंकिता लोखंडेवर रोजलिननं निशाणा साधला आहे. तिनं सोशल मीडियावर अंकिता लोखंडेवर आरोप केला की दिवंगत अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंहच्या मृत्यूचा वापर करुन ती स्वत:चा फायदा करते.
तिनं नुकत्याच शेअर केलल्या पोस्टमध्ये रोजलिननं लिहिलं की एक महिला जी तिच्या एक्सच्या मृत्यूचा फायदा बिग बॉससाठी करु शकते. ती मला घाणेरडेपणावरून उपदेश देते! यात कोणतीही मोठी गोष्ट नाही... इथे सगळे फुकटात मिळणाऱ्या पब्लिसिटी घेण्यासाठी बसले आहेत. तिनं म्हटलं की मित्रांनो, मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात सांगितलं होतं की कशा प्रकारे या छोट्या पडद्यावरील अभिनेत्री फॅन पेजचा वापर करत माझे व्हिडीओ पुन्हा शेअर करतात. मला त्रास देण्यासाठी आणि मला ट्रोल करण्यासाठी फॅन पेजचा वापर करणाऱ्या हिनाचा कॅन्सर कॅन्सर आहे आणि माझा कॅन्सर हा काय फक्त टाईम पाससाठी आहे का?
रोजलिन खान पुढे म्हणाली, मी एका महिलेला एक्सपोज करत होते आणि दुसरी फुकटात आली, पण जाऊ द्या तिच्याकडे दुर्लक्ष करुया. फक्त दुर्लक्ष करा. आता ती मला कॅन्सरवर उपदेश देण्यासाठी आलीये. दुसरीकडे तिला स्वत: ला तिचं लग्न टिकवून ठेवण्यासाठी मदतीची गरज आहे. मी सतत सांगेन की मी हिना हिना खानच्या 15 तासांच्या शस्त्रक्रियेबद्दल आणि उपचारांमधील विसंगतींबद्दल एक साधा प्रश्न विचारल्यानं, त्यांनी त्यावर गप्प राहणं पसंत केलं. इतकंच नाही तर रुग्णालयानेही रुग्णाच्या गोपनीयतेच्या काळजीचं पालन केले आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी एक दुसरा पर्याय निवडला म्हणजे अर्थात मला त्रास देण्याचा. काही अज्ञात लोक मला धमकावत होते, माझ्या पेजवर वाईट कमेंट्स पोस्ट करण्यासाठी अनेक बॉट सेट तयारच होते. टीव्ही अभिनेत्रीचं फॅन पेज माझे व्हिडिओ शेअर करत होते, जेणेकरून मला अधिक ट्रोल करता येईल, म्हणून माझ्याकडे स्थानिक पोलिस स्टेशनला कळवण्याशिवाय पर्याय नव्हता."
हेही वाचा : UK से आया मेरा दोस्त... अरिजीत सिंग आणि एड शीरनच्या Night Out चा VIDEO VIRAL
रोजलिन इथेच थांबली नाही तर पुढे देखील ती बोलताना दिसली. तिनं पुढे अंकिता लोखंडेनं वास्तव्याची तपासणी न करता, अधिकृतपणे माझ्या पात्रतेवर हल्ला केला. महत्त्वाचं म्हणजे हे आश्चर्यकारक आहे. या तमाश्यानंतर तर कथित शेरणी ही सांगू शकत नाही की कोणती शस्त्रक्रिया झाली ज्यात 15 तास लागले आणि त्यासोबत कर्करोगावर उपचार आणि मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर स्कूबा डायव्हिंग, स्नो स्लाइडिंग आणि सर्व प्रकारचे स्टंट करणे आणि शुटिंग करणे कसे शक्य होते. ज्यामध्ये 15 तासांचा कालावधी लागला?? हिनाचा कर्करोग, कर्करोग.. माझा आणि बाकी 20 लाख कर्करोग रुग्णांचा कर्करोग टाइमपास..! ' रोजलिनची ही पोस्ट अंकितानं नुकत्याच केलेल्या कमेंटवर उत्तर आहे.