मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन आणि तिच्या ड्रायव्हरने दारूच्या नशेत एका वृद्ध महिलेवर गाडी चढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री घडल्याचा दावा पीडित मुलाने केला आहे. मुंबईतील वांद्रे येथील रिझवी लॉ कॉलेजजवळ रवीनाच्या कारने तिच्या आईला दुखापत केली यानंतर रवीनाचा ड्रायव्हर कारमधून बाहेर आला आणि माझ्या आईसोबत तसंच कुटुंबातील इतर सदस्यांशी वाद घालू लागले. त्यांनी हाणामारीही सुरू केली. यानंतर रवीनाही गाडीतून खाली उतरली आणि त्यांच्याशी भांडू लागली असं अज्ञात वक्तीचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर या मारहाणीत अज्ञात व्यक्तीच्या आईला आणि बहिणीला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहे.
समोर आलेल्या या व्हिडिओत रवीनाला अज्ञात व्यक्तीचं कुटुंब आणि स्थानिक जमावाने घेरले आहे. पोलिसांना बोलवा असे लोक बोलत आहेत. दरम्यान, पीडित महिलेची मुलगी रवीनाला म्हणते, 'तुला संपूर्ण रात्र तुरुंगात काढावी लागेल. माझ्या नाकातून रक्त येत आहे.' रवीना समोर असलेल्या माणसांना सांगताना दिसतेय की, 'कृपया मला धक्का देऊ नका... मारू नका...' व्हिडीओ शूट न करण्याची विनंतीही अभिनेत्री तिथे उपस्थित जमावाला करत आहे.
Allegations of Assault by RaveenaTandon her driver on elderly Woman Incident near Rizvi law college family Claims that TandonRaveena was under influence of Alcohol women have got head injuries, Family is at Khar Police station MumbaiPolice CPMumbaiPolice @mieknathshinde pic.twitter.com/eZ0YQxvW3g
Mohsin shaikh June 1, 2024
पीडितेने पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस कारवाईत कडकपणा दाखवत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. जखमी महिलेचे वय ७० वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे.त्यांचा मुलगा मोहम्मद म्हणाला- आम्ही आमच्या मुलीला स्थळ बघण्यासाठी गेलो होतो. वाटेत रिझवी लॉ कॉलेजजवळ रवीनाची कार उभी होती. आम्ही तिथून निघालो होतो तेव्हा गाडी थोडी उलटली.त्यामुळे माझ्या आईला मोठा फटका बसला. आम्ही आक्षेप घेतल्यावर चालकाने अरेरावी करण्यास सुरुवात केली. कारमध्ये रविना टंडनही उपस्थित होती. तीही गाडीतून बाहेर आली आणि आमच्याशी वाद घालू लागली. ती दारूच्या नशेत होती आणि ती माझ्या आईला मारहाण करू लागली. इतकंच नाही तर खार पोलीस तक्रार घेत नसल्याचा लोकांचा आरोप आहे. या संदर्भात आम्ही रवीना टंडणची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यावरं अभिनेत्रीकडून कोणताच संपर्क होवू शकला नाही. या संपुर्ण प्रकरणावर बोलण्यास अभिनेत्री आणि तिची पिआर टीम टाळाटाळ करत असल्याचं समोर आलं आहे.