'पत्नीला सोडून दुसऱ्या रुममध्ये...'; एआर रहमान यांच्या साडूनं सांगितला गायकाच्या हनिमूनचा किस्सा

Actor Rahman on AR Rahman's Honeymoon : अभिनेता रहमाननं साडू एआर रहमानच्या हनिमूनचा किस्सा केला शेअर...

दिक्षा पाटील | Updated: Oct 23, 2024, 01:31 PM IST
'पत्नीला सोडून दुसऱ्या रुममध्ये...'; एआर रहमान यांच्या साडूनं सांगितला गायकाच्या हनिमूनचा किस्सा title=
(Photo Credit : Social Media)

Actor Rahman on AR Rahman's Honeymoon : लोकप्रिय मल्याळम अभिनेता रहमान आणि लोकप्रिय म्यूजिक कंपोजर आणि गायक एआर रहमान नातेवाईक आहेत. अभिनेता रहमानची पत्नी आणि गायक एआर रहमानची पत्नी बहिणी आहेत. अभिनेता रहमानविषयी बोलायचं झालं तर तो सध्या अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘1000 बेबीज’ या वेब सीरिजमध्ये दिसत आहे. सीरिज प्रदर्शित झाली असली तरी देखील कलाकार अजूनही प्रमोशन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर या निमित्तानं अभिनेता रहमाननं त्याचे साडू असणाऱ्या एआर रहमानशी संबंधीत एक मजेशीर खुलासा केला आहे. त्यानं एआर रहमानच्या हनीमूनचा असा एक किस्सा सांगितला आहे की जो ऐकून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 

अभिनेता रहमाननं यूट्यूबर सिद्धार्थ कननला एक मुलाखत दिली आहे. यावेळी त्यानं सांगितलं की एआर रहमान खूप वेगळा आहे. त्या दोघांचं नेचर हे खूप वेगळं किंवा अगदी विरुद्ध आहे. ते म्हणाले की आम्हा दोघांचं चरित्र पूर्ण वेगळं आहे. ते पूर्व-पश्चिम आहेत. एआर रहमान कामाशी काम ठेवतो आणि अल्हाची प्रार्थना करतो. हे सिद्ध करून दाखवण्यासाठी त्यानं एआर रहमानच्या हनीमूनचा एक किस्सा सांगितला. त्यानं सांगितलं की 'एका हिल स्टेशनवर तो त्याच्या पत्नीसोबत हनीमुनला गेला होता. रात्रीच्या 12-1 वाजता मी त्यांना कॉल केला तर त्यांच्या पत्नीनं फोन उचलला आणि ती जवळपास झोपली होती. मी जेव्हा त्यांना विचारलं की रहमान कुठे आहे, तर तेव्हा तिनं सांगितलं की दुसऱ्या रूममध्ये तो वीणाचा अभ्यास करत आहे. एआर रहमान त्यांच्या कामाला घेऊन समर्पित आहे. ते फक्त त्यांच्याच विश्वास असतात. ते अशा प्रकारचे व्यक्ती आहेत.'

पुढे अभिनेता रहमान म्हणाला, 'मी लोकांविषयी बोलत नाही. पण गॉसिप ऐकायला खूप मज्जा येते. मला लोकांना भेटायला खूप आवडतं.' 

हेही वाचा : 'दंगल'नं 2000 कोटींची कमाई करुनही, पण माझ्या कुटुंबाला 1...; बबीता फोगाटचा मोठा दावा

दरम्यान, एआर रहमान यांना 2009 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘स्लमडॉग मिलियनेयर’ मधील गाण्यासाठी दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले. त्यांनी 'जय हो' साठी बेस्ट ओरिजिनल स्कोर आणि बेस्ट ओरिजिनल सॉन्ग कॅटेगरीमध्ये अवॉर्ड्स जिंकलं होते. या गाण्यासाठी त्यांना 2 ग्रॅमी पुरस्कार मिळाले होते.