सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच अॅक्टिव असणारे अभिनेते अनुपम खेर (anupam kher) सध्या ट्रोल (Troll) झाले आहेत. आग्रा-नोएडा एक्स्प्रेस वेबाबत (agra noida expressway) केलेल्या एका ट्विटमुळे (Tweet) अनुपम खेर यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. या ट्विटमध्ये अनुपम खेर (anupam kher) यांनी हा महामार्ग (expressway) मोदी सरकारचे (Modi Governmesnt) यश असल्याचे सांगितले. त्याबद्दल त्यांनी केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचेही आभार मानले. त्यामुळे ट्विटरवर (twitter) लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. (actor anupam kher Troll for giving credit of yamuna expressway to Niti Gadkari)
"आग्रा-दिल्ली हायवेवरचा (agra delhi highway) प्रवास किती आनंददायी आहे. आपल्या भारतात जागतिक दर्जाचे रस्ते असल्याचा अभिमान वाटतो. नितीन गडकरी जी (Nitin Gadkari) आणि तुमच्या टीमचे उत्तम प्रयत्नाबद्दल आभार. देश बदलत आहे. देशातील रस्ते बदलत आहेत. जय हो," असे ट्विट अनुपम खेर यांनी बुधवारी केले होते. या ट्विटवरुन लोकांनी अनुपम खेर (anupam kher) यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय.
What a delight it is to travel on the Agra-Delhi highway! Such a proud feeling to have world class roads in अपना भारत! Thank you @nitin_gadkari ji and your team for your wonderful efforts! देश बदल रहा है! देश की सड़के बदल रहीं हैं! जय हो! #Highways #Agra #Delhi #India pic.twitter.com/C0Shw3IkKe
— Anupam Kher (@AnupamPKher) October 12, 2022
अभिनेते अनुपम खेर यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. "अनुपम खेरसाहेब, एक कलाकार म्हणून मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, कारण तुम्ही त्यासाठी पात्र आहात. पण खोटे बोलून जनतेची दिशाभूल करू नका. आग्रा-दिल्ली महामार्ग (agra delhi highway), ज्याचे श्रेय तुम्ही गडकरी (Nitin Gadkari) आणि भाजपला (BJP) देत आहात, तो मायावतींनी (mayawati) बांधला होता. तुमच्या चाहत्यांना तुमच्याकडून योग्य माहितीची अपेक्षा आहे," असे ब्रिजेश भारती या युजरने म्हटलं आहे.
अनुपम खेर साहब, एक कलाकार के रूप में मैं आपकी बहुत इज्जत करता हूँ क्योंकि आप उसके हक़दार हैं। लेकिन झूठ बोलकर जनता को भ्रम में न रखें। जिस आगरा - दिल्ली हाईवे का श्रेय आप गडकरी और बीजेपी को दे रहे हैं, वह मायावती जी ने बनवाया था। आपके फैन्स आपसे सही जानकारी की उम्मीद रखते हैं
— BRIJESH BHARTI (@BRIJESH59707821) October 13, 2022
बसपा अध्यक्ष मायावती यांचे पुतणे आकाश आनंद यांनीही अनुपम खेर यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. अनुपम खेर जी, तुम्हाला हा एक्सप्रेसवे आवडला हे छान आहे. इथे तुम्ही चुकून गडकरीजींना टॅग केले. हा आग्रा-नोएडा एक्स्प्रेस वे आदरणीय मायावती जी यांच्या कार्यकाळात बांधण्यात आला होता. तेव्हा भक्कम इरादे होते म्हणून मजबूत रस्ते बांधले जायचे, एवढेच माझे म्हणणे आहे, असे आकाश आनंद यांनी म्हटलंय.
अनुपम खेर जी, अच्छा लगा कि आपको ये एक्सप्रेस वे पसंद आया, इसकी मज़बूती अच्छी लगी, बस यहाँ आप गलती से गडकरी जी को टैग कर गए। ये आगरा- नोएडा एक्सप्रेस वे आदरणीय @mayawati जी के कार्यकाल में बनाया गया था। तब मज़बूत इरादे थे तो मज़बूत सड़कें बनती थी,बस इतना ही कहना है मुझे। https://t.co/HJJacQGLyx
— Akash Anand (@AnandAkash_BSP) October 13, 2022
दरम्याना यमुना एक्सप्रेसवे प्रकल्पाची संकल्पना राजनाथ सिंह यांनी 2001 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना मांडली होती. मायावती राज्याच्या मुख्यमंत्री असताना 2007 मध्ये याचे काम सुरू झाले. त्यानंतर ऑगस्ट 2012 मध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.