अबू सालेमची EX गर्लफ्रेंड लवकरच दिसणार 'या' शोमध्ये, पाहा फोटोज

१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, दुसरीकडे त्याची एकेकाळची गर्लफ्रेंड मोनिका बेदी पूनरागमन करत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 7, 2017, 05:41 PM IST
अबू सालेमची EX गर्लफ्रेंड लवकरच दिसणार 'या' शोमध्ये, पाहा फोटोज title=
Image: Instagram

मुंबई : १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, दुसरीकडे त्याची एकेकाळची गर्लफ्रेंड मोनिका बेदी पूनरागमन करत आहे.

अबू सालेम हा त्याच्या प्रेमप्रकरणामुळेही चर्चेत आला होता. अभिनेत्री मोनिका बेदी आणि अबू सालेम यांच्या प्रेमप्रकरणाच्या जोरदार चर्चाही रंगल्या होत्या. हीच मोनिका बेदी आता पून्हा एकदा टीव्ही शोच्या माध्यमातून पूनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

टीव्ही शो 'सरस्वतीचंद्र' आणि 'बंधन' मध्ये भूमिका केलेली मोनिका बेदी लवकरच एका नव्या टीव्ही शोमध्ये दिसणार आहे. टीव्ही शो 'मासूम'मधून अभिनेत्री मोनिका बेदी छोट्या पडद्यावर पूनरागमन करत आहे.

 

Remembering #MahatmaGandhi today! #GandhiJayanti. #India #FatherOfTheNation #FreedomFighter

A post shared by Monica Bedi (@memonicabedi) on

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोनिका बेदी लाईफ ओके चॅनलवर येणा-या 'मासूम' या शोमध्ये दिसणार आहे. दरम्यान, संजय दत्त याच्यासोबत 'जोडी नंबर वन', अभिनेता सलमान खानसोबत 'जानम समझा करो' आणि 'प्यार, इश्क आणि मोहब्बत' मध्ये अभिनय केलेली अभिनेत्री मोनिका बेदीला पोर्तुगालमध्ये सालेमसोबत अटक करण्यात आली होती.

 

My latest photoshoot how's it guys

A post shared by Monica Bedi (@memonicabedi) on

त्यानंतर मोनिकाने अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली आणि छोट्या पडद्यावर अनेक भूमिका केल्या. मोनिका बेदी 'बिग बॉस' च्या दुसऱ्या सीजनमध्ये दिसली होती. बिग बॉसमध्ये तिने खूप प्रसिद्धी मिळवली. पाहूयात याच मोनिका बेदीचे काही खास फोटोज...

 

Nothing like shopping on a weekday. No crowd to compete with. #ShoppingScene #Mumbai #Poser #MyTime #ShoppingTime

A post shared by Monica Bedi (@memonicabedi) on

असे म्हटले जात आहे की, अभिनेत्री मोनिका बेदीने 'बिग बॉस'च्या सीजनमध्ये भाग घेतल्यानंतर नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात केली आहे.