नोकरीसाठी Resume पाठवण्याआधी 'या' नक्की वाचा, हमखास मिळेल नोकरी

आधुनीकिकरणामुळे खाजगी क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. त्यामुळे जर तुम्ही नोकरी शोधत असाल, तर तुमच्या रिझ्युमेमध्ये काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे. यामुळे तुमचा सीव्ही अधिक प्रभावी बनेल आणि नोकरी मिळवण्याच्या संधी वाढतील.  

Updated: Feb 17, 2025, 06:53 PM IST
नोकरीसाठी Resume पाठवण्याआधी 'या' नक्की वाचा, हमखास मिळेल नोकरी

How to make perfect resume: रिझ्युमे तयार करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. लोकांकडे मोठमोठे लेख वाचण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे केवळ खरी आणि आवश्यक माहितीचाच समावेश करा. त्यामुळे तुमच्या रिझ्युमे हा छोटा आणि आकर्षक असावा. तुम्ही आवश्यकता असल्यास काही नवीन रिझ्युमे ट्रेंड्सचा अवलंब करू शकता. रेज्युमे तयार करताना सोपे आणि प्रोफेशनल लेआउट वापरा. AI टूल्स किंवा ऑनलाइन टेम्पलेट्स वापरून जास्त आकर्षक बनवा, रेज्युमे PDF फॉरमॅटमध्ये सेव्ह करा आणि पाठवा.

रिझ्युमेमधून अनावश्यक वैयक्तिक माहिती काढून टाका

जर तुमच्या रिझ्युमेमध्ये वैवाहिक स्थिती (Marital Status), धर्म (Religion), जन्मतारीख (Date of Birth) यासारखी माहिती असेल, तर ती लगेच काढून टाका. यामुळे रेज्युमे अनावश्यक मोठा होतो. त्याऐवजी, LinkedIn प्रोफाइल किंवा इतर व्यावसायिक प्रोफाइल्सचा समावेश करा. मात्र, मोबाईल नंबर आणि ईमेल हे नक्की द्या, जेणेकरून कंपनी सहज संपर्क करू शकेल.

नोकरीच्या प्रकारानुसार उद्दिष्ट (Objective) लिहा

अनेक लोक एकच उद्दिष्ट (Objective) सगळ्या नोकऱ्यांसाठी वापरतात, पण प्रत्येक कंपनीसाठी ते योग्य नसते. त्यामुळे तुम्ही ज्या कंपनीत अर्ज करत आहात, त्या नोकरीसाठी योग्य असे उद्दिष्ट लिहा. यामुळे तुमचा रेज्युमे जास्त प्रभावी दिसेल.

फक्त संबंधित अनुभव जोडा

रिझ्युमे बनवताना, तुम्ही अर्ज करत असलेल्या कंपनीच्या गरजा लक्षात घ्या आणि त्यानुसार अनुभव लिहा. जर एखादा अनुभव त्या नोकरीसाठी उपयुक्त नसेल, तर तो टाळणेच योग्य. उदा. कॉलेजमध्ये केलेल्या छोट्या-मोठ्या इंटर्नशिप किंवा नोकऱ्या त्या कंपनीसाठी उपयुक्त नसतील, तर त्या लिहू नका. यामुळे एचआर (HR) ला तुमचा रेज्युमे अधिक व्यवस्थित आणि योग्य वाटेल.

स्पर्धा व पुरस्कारांचा समावेश फक्त गरजेपुरताच करा

शाळेत किंवा कॉलेजमध्ये तुम्ही अनेक स्पर्धा जिंकल्या असतील. पण, त्या जर तुम्ही अर्ज करत असलेल्या नोकरीशी संबंधित नसतील, तर त्या रेज्युमेमध्ये टाकू नका. त्याऐवजी, तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्या.

जे माहित नाही ते रिझ्युमेमध्ये लिहू नका

कधी कधी लोक रेज्युमेमध्ये अशा गोष्टी लिहितात ज्या त्यांना स्वतःलाच नीट माहित नसतात. जर मुलाखतीमध्ये (Interview) याबद्दल प्रश्न विचारले गेले आणि तुम्हाला उत्तर देता आले नाही, तर तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते.

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने, स्मार्ट आणि प्रोफेशनल रेज्युमे तयार करा आणि नोकरीच्या उत्तम संधी मिळवा!