फायनलआधी सचिनने मुंबई इंडीयन्स टीमला दिला मेसेज, पाहा व्हिडीओ

मुंबई इंडीयन्स आयपीएलच्या सर्वात मजबूत टीमपैकी एक आहे. टीमने आतापर्यंत चार विजय मिळवले आहेत. यावेळी देखील ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबई इंडीयन्स मैदानात उतरेल.

Updated: Nov 9, 2020, 08:36 PM IST
फायनलआधी सचिनने मुंबई इंडीयन्स टीमला दिला मेसेज, पाहा व्हिडीओ  title=

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल (IPL 2020) च्या १३ व्या सिझनमध्ये ५ व्यांदा खिताब मिळवण्यास सज्ज झालीय. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स पहील्यांदाच हा खिताब मिळवण्यासाठी तयार आहे. फायनल मॅच होण्यास आता १ दिवस राहीलाय. 

फायनलच्या मॅच आधी मुंबई इंडीयन्सने एक व्हिडीओ शेअर केलाय. मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू आणि विश्वसनीय सल्लागार सचिन तेंडुलकरने ( Sachin Tendulkar)  मेसेज दिलाय. 

संघ मालकापासून सपोर्ट स्टाफ आणि सर्व तुमच्यामागे उभे आहेत आणि तुम्ही मुंबई इंडीयन्ससाठी खेळायला जाताय, तेव्हा तुम्ही एकटे नसता. तर पूर्ण फोर्स तुमच्या सोबत असते. ही तुमच्याकडून तुमचे बेस्ट काढतात. तुम्ही सर्वकाही करु शकता ज्यामुळे तुमचा खेळ मोठ्या लेव्हलपर्यंत नेऊ शकता असे सचिन म्हणाला. 

सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट ही आहे की हे एक कुटुंब आहे. खेळात किंवा आयुष्यात चढउतार असतात. आव्हान येतात. पण आम्ही सर्व एकत्र असतो. खासकरुन ही स्पर्धा खूप वेगाने पुढे चाललीय. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. सर्व मजबुतीने एक साथ आहेत आणि असं करण्यात आम्ही यशस्वी देखील झालोय असे तो पुढे म्हणाला.

मुंबई इंडीयन्स आयपीएलच्या सर्वात मजबूत टीमपैकी एक आहे. टीमने आतापर्यंत चार विजय मिळवले आहेत. यावेळी देखील ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबई इंडीयन्स मैदानात उतरेल.