जगभरात कोरोनाचे १० लाखांवर रुग्ण, ५३ हजारांवर मृत्यू

एका दिवसात ५९६८ बळी

Updated: Apr 3, 2020, 11:01 AM IST
जगभरात कोरोनाचे १० लाखांवर रुग्ण, ५३ हजारांवर मृत्यू title=

ब्युरो रिपोर्ट :  जगभरात कोरोनाचं संकट किती तीव्र झालं आहे हे नव्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० लाखांवर गेली आहे. तर मृतांचा आकडा ५३ हजार २५८ इतका झाला आहे. एका दिवसात ७९ हजारावर रुग्ण वाढले आहेत.

एका दिवसात ५ हजार ९६८ बळी

दिवसेदिवस कोरोना व्हायरसमुळे मृतांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे. आठवडाभरापूर्वी रोजचा मृतांचा आकडा अडीच हजारावर पोहचला होता. आठवडाभरानंतर हा आकडा दुप्पट होऊन आता तो सहा हजाराच्या जवळपास पोहचला आहे. सर्वाधिक मृतांची संख्या ही फ्रान्स आणि अमेरिकेत आहे. त्यानंतर इटली आणि स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत.

फ्रान्समध्ये एका दिवसात १३५५ जणांचा बळी

अमेरिकेत मृतांचा आकडा ६०८८ इतका झालाय. अमेरिकेत एका दिवसात ९६८ बळी गेले. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा अडीच हजारावर पोहचला आहे. गुरुवारी सर्वाधिक बळी फ्रान्समध्ये गेले आहेत. फ्रान्समध्ये एका दिवसात १३५५ जणांचा बळी गेला आहे आणि मृतांचा आकडा ५३८७ वर पोहचला आहे. इटलीमध्ये १३,९१५ जणांचा मृत्यू झालाय. स्पेनमध्ये १०,३४५ जण कोरोनामुळे दगावलेत.

<p><iframe allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen="" frameborder="0" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" width="560"></iframe></p>

फ्रान्समध्येही कोरोना मृतांची संख्या पाच हजारावर गेली असून आतापर्यंत ५,३८७ जणांचा बळी गेला आहे. ब्रिटनमध्ये २९२१, नेदरलॅन्डमध्ये १,३३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जर्मनी आणि बेल्जियमनेही एक हजाराचा आकडा पार केला असून जर्मनीत ११०७ तर बेल्जियममध्ये १०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. चीनमध्ये ३३२२, इराणमध्ये ३१६० जण कोरोनामुळे दगावले आहेत.