मुंबई : भारतात काही दिवसांपासून नामिबियातून आणलेला चित्ता चर्चेत आहे. भारतातून चित्ता (Cheetah) नष्ट झाल्यामुळे भारताला परदेशातून तो भारतात आणावा लागला. जगातील असेच अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांच्या सरकारने त्यांच्या शिकारीवर बंदी घातली आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या प्राण्यांची किंमत देखील मोठी असते. चला जाणून घेऊया अशाच एका माशाबद्दल जो जगातील सर्वात महाग मासा आहे. अलीकडेच हा मासा इंग्लंडमध्ये दिसला. (world's most expensive fish and his Rate)
अटलांटिक ब्लूफिन टूना (Atlantic Bluefin Tuna) हा जगातील सर्वात महाग विकला जाणारा मासा आहे. नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेला अटलांटिक ब्लूफिन टूना (Atlantic Bluefin Tuna) पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. जगातील सर्वात महागड्या माशांचा विक्रम अटलांटिक ब्लूफिन टुनाच्या नावावर आहे. या माशाच्या संवर्धनासाठी दरवर्षी 2 मे रोजी जागतिक टूना दिवस साजरा केला जातो. हे वाचवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी डिसेंबर 2016 मध्ये अधिकृतपणे जागतिक टूना दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
यूके सरकारने अटलांटिक ब्लूफिन ट्यूनाच्या (Atlantic Bluefin Tuna) शिकारीवर बंदी घातली आहे. याशिवाय हा मासा पकडल्यास तुरुंगवास आणि दंडही होऊ शकतो. चुकून कोणी पकडला तरी तो लगेच समुद्रात सोडावा लागतो. 23 ऑक्टोबर रोजी एका व्यक्तीने अनेक ब्लूफिन टूना मासे एकत्र पाहिले होते. हे मासे पाहून त्याचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. याआधीही ऑगस्ट महिन्यात टूना मासा दिसला होता. अटलांटिक ब्लूफिन ट्यूना कॉर्नवॉल, इंग्लंडमध्ये 100 वर्षांपासून दिसला नाही असे मानले जाते. आता हा मासा उन्हाळ्यात अनेकदा पाहायला मिळतो.
या माशाशी संबंधित अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. या माशाचा आकार ट्यूना प्रजातींपैकी सर्वात मोठा आहे आणि तो खूप वेगाने पोहतो. नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचलेला हा मासा पाणबुडीतून निघणाऱ्या टॉर्पेडो शस्त्रासारखा आहे. या आकारामुळे ते समुद्रात लांब पल्ल्यापर्यंत वेगाने पोहू शकते.
तज्ञांच्या मते, या माशाची लांबी 3 मीटर पर्यंत असू शकते आणि वजन सुमारे 250 किलो आहे. हा मासा मानवाला कोणतीही हानी पोहोचवत नाही. हा मासा इतर लहान मासे खातो. अटलांटिक ब्लूफिन ट्यूना या माशाची किंमत 23 कोटींपर्यंत असू शकते.