World Sparrow Day 2023: आपल्याकडे चिमण्या आता दिसणंही कमीच झालं आहे हे वाक्य आपल्या तोंडात हमखास (China Sparrow War) बसलं आहे. पुर्वी चिमण्यांचा आपल्याला थवा पाहायला मिळायचा. आपल्या लहानपणी आपण आपल्या घरात कुठेतरी एकदातरी चिमणीनं केलेलं घरटं पाहिले असेलच. परंतु आता चिमण्या या संपुर्णपणे नामशेष झाल्यातच (Why Sparrow Disappeared) जमा आहेत. सकाळी सकाळी चिमण्यांचा चिवचिवाट ऐकल्याशिवाय आपल्याला जाग येत नसे. चिमण्यांच्या बाबतीत अशा अनेक आठवणी आपल्या आहेत परंतु मोबाईल टॉवर (Moblie Tower) आल्यानंतर मात्र चिमण्यांचे अस्तित्व संकटात आले आणि त्यातून जसजसे माणसांचे राज्य हे वाढू लागले तसतसे चिमण्यांसारखे अनेक पक्षी हे नामशेष होण्याच्याच मार्गावर आले. आज 'जागतिक चिमणी दिवस' (World Sparrow Day) आहे तेव्हा यानिमित्तानं जाणून घेऊया चिमण्यांबद्दलचे इंटरेस्टिंग फॅक्ट्स. (World Sparrow Day China Sparrow War in 1958 millions of sparrows were killed in china world news in marathi)
आज आपण अशाच एका रंजक युद्धाबद्दल जाणून घेणार आहोत आणि हे युद्ध होतं चिमण्यांविरूद्ध! हो, तुम्ही बरोबर ऐकलंत. तुम्हाला जाणून कदाचित आश्चर्य वाटेल की चिमण्यांच्या विरूद्ध युद्ध कोणी पुकारलं असावं? तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की असं काय घडलं होतं.
चीन (China) हा असा देश आहे जो आपल्या हुकूमशाही वृत्तीसाठी ओळखला जातो. अशीच गोष्ट चीनच्या रणभूमीवर घडली होती. माओत्से तुंग (Mao Zedong) नावाच्या एका क्रांतिकारकानं देशात असणाऱ्या सर्व चिमण्यानं मारण्याचा हुकूम जारी केला होता. हा आदेश मिळताच चिमण्यांना मारायला सुरूवातही केली होती. याचे कारण असे होते की चिमण्या दाणे खातात त्यानं देशातील धान्य कमी होऊ लागले होते व त्यासाठी चिमण्यांना मारण्याचा हुकूम त्यानं दिला होता. एक अन् दाणा हा फक्त इथल्या माणसांसाठीच असावा या स्वार्थी भावनेतून नैसर्गिकाच्या नियमाच्या विरूद्ध जात दिलेला हा आदेश देणं नंतर चीनला बरंच महागातही पडलं. तुम्हाला जाणून कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल की यामुळे देशातील लोकांच्या मृत्यूसंख्येतही मोठी वाढ झाली.
त्यावेळी दिलेल्या आदेशानुसार, चिमण्यांना अक्षरक्ष: गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यांची घरटी पाडली त्यानंतर त्यांची अंडीही फोडली. त्यांचा पाठलाग करण्यात आला आणि त्या मरेपर्यंत त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. माओत्से तुंग यांनी 1958 मध्ये हे कॅपेंन सुरू केले होते. याचे नावं होतं फोर पेस्ट्स कॅपेंन (Four Pests Campaign). यातून माश्या, डास, उंदीर आणि चिमण्या यांना मारायला सुरूवात केली. यांच्यामुळे देशात अनेक तऱ्हेचे नुकसान होते आहे म्हणून यांच्यावर अन्याय करायला चीनच्या सरकारनं सुरूवात केली होती.
निसर्ग नियमाच्या विरूद्ध असलेले हे धोरण चीनला चांगलेच महागात पडले. इतिहासकारांच्या मते, या काळात चीनची पुढे जाण्यासाठी वेड्यासारखा धावत होता. या हट्टापायी पक्षी मारून त्यांच्या आयुष्याचे नुकसान करता करता चीनचे महाभयंकर नुकसान झाले. या काळात इतका दुष्काळ पडला की याची भरपाई करणंही त्याला कठीण गेलं. माओत्से तुंगनं हा विचार कधीच केला नाही की यामुळे नैसर्गितक फूड सायकल बिघडू शकते. परंतु याचा परिणाम उलटा चीनवरच झाला. चिमण्या या फक्त दाणेच नाही तर कीटकही खायच्या. धान्य खराब होऊ लागले आणि घरात धान्य नसल्यानं लोकं मरू लागले, अशी एक माहिती कळते. असं म्हणतात की, हा परिणाम पाहून माओत्से तुंगनं हा आदेश मागे घेतला.