South Korean मुलीनं पहिल्यांदा खाल्ली पाणीपुरी... चव चाखत म्हणाली...

South Korean Viral Video: सगळ्यांनाच पाणीपुरी खूप आवडते. पाणीपुरीची (Panipuri) क्रेझ आता अख्ख्या जगात निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीपुरीचीच चर्चा होते. मुंबई, दिल्ली, इंदौर भागात आपण गेलो आणि तिकडचं स्ट्रीटफूड (street Food) खाल्लं नाही आणि त्यातून पाणी पुरी खाल्ली नाही असं होणारच नाही. 

Updated: Jan 14, 2023, 10:03 PM IST
South Korean मुलीनं पहिल्यांदा खाल्ली पाणीपुरी... चव चाखत म्हणाली...  title=

South Korean Viral Video: सगळ्यांनाच पाणीपुरी खूप आवडते. पाणीपुरीची (Panipuri) क्रेझ आता अख्ख्या जगात निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीपुरीचीच चर्चा होते. मुंबई, दिल्ली, इंदौर भागात आपण गेलो आणि तिकडचं स्ट्रीटफूड (street Food) खाल्लं नाही आणि त्यातून पाणी पुरी खाल्ली नाही असं होणारच नाही. तेव्हा पाणीपुरी ही पर्यटकांसाठी पर्वणीच असते. येथे येणारा प्रत्येक पर्यटक हा इथ आल्यावर पाणीपुरी खातोच खातोच. मुंबईकर, दिल्लीकरही पाणीपुरीवर हमखास ताव मारतात. त्यातून परदेशी पर्यटकही पाणीपुरीला ना म्हणत नाहीत. सध्या अशाच एका साऊथ कोरियन मुलीचा (south Korean Girl Viral Video) व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यानं तिनं पहिल्यांदाच पाणीपुरी ट्राय केली आहे. पाणीपुरी पहिल्यांदा ट्राय केल्यानंतर तिनं आपली हटके प्रतिक्रियाही नोंदवली आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. (viral video a south korean girl tastes gol gappa for the first time see what she says)

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, या मुलीनं निळ्या रंगाची साडी (Blue Saree) घातली आहे आणि त्यावर ज्वेलरीही घातली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांचे लक्ष तिच्याकडेच वेधले आहे, त्यातून एका दुकानापाशी उभी राहून ती गोल गप्पे म्हणजे टेस्टी पाणी पुरी खाताना आणि एन्जॉय करताना दिसते आहे. Meggy Kim या नावाच्या या साऊथ कोरियन मुलीनं तिच्या याच नावाच्या इन्टाग्राम अकांऊटवरून (Instagram) एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात तिनं चक्क पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसते आहे. काही दिवसांपुर्वी ती भारतात आली होती. 

हा व्हिडीओ शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, 'शेअर इट विथ यूवर पानी पूरी लव्हर', म्हणजे पाणीपुरीवर प्रेम करणाऱ्यांसोबत हा व्हिडीओ शेअर करा. यामध्ये तिनं इंडियन स्ट्रीट फूड असं हॅशटॅगही टाकलं आहे. चिंच, हिंग, जलजीरा, पुदीना, लसूण असे काही पाणीपुरीचे फ्लेवर्स (Panipuri Flavours) तिनं यावेळी ट्राय केले. त्यानंतर ती यामधला एक एक फ्लॅवर ट्राय करते आणि त्याची टेस्ट ओळखायचा प्रयत्न करते. त्याचसोबत एक एक करून या सर्व फ्लेवर्सना ट्राय केल्यानंतर ती प्रत्येक फ्लेवरला रेटिंगही देते. 

हेही वाचा - Viral: प्रसिद्ध मॉडेलनं एका वर्षात फक्त 37 वेळाच आंघोळ केली? कारण ऐकून धक्का बसेल

सध्या हा व्हिडीओ सगळीकडे खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडीओला (Video) आत्तापर्यंत 70,000 हून जास्त लाईक्स आले आहेत तर या व्हिडीओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे तर अनेकांनी या व्हिडीओ शेअरही केले आहे. या व्हिडीओखाली लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया (Mixed Reactions) आल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेकांनी तिच्या या लुकचं कौतुक केलं आहे तर अनेकांनी तिच्यावर टीकाही केली आहे. परंतु या व्हिडीओला सर्वाधिक लोकांनी पसंती दिली आहे.