कॉकेशस/येरेवान : अजरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात 6 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. आतापर्यंत 2700 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. आता हे दोन्ही देश एकमेकांच्या नागरिकांना लक्ष्य करत आहेत. तुर्की (Turkey) आणि पाकिस्तानने आता अजरबैजानसाठी दहशतवाद्यांना युद्धात उतरवलं आहे. WION या वाहिनीला अर्मेनियाचे उपपरराष्ट्रमंत्री यांनी माहिती दिली आहे. तुर्की आणि पाकिस्तानमुळे आता हे युद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागोर्नो-काराबाख हे अजरबैजान आणि अर्मेनिया यांच्यातील युद्धांचं मैदान बनलं आहे. ख्रिश्चन बहुसंख्य असलेल्या आर्मेनियाविरूद्ध इस्लामी देश एकत्र आले आहेत. इस्लामी देशांना अझरबैजानला समर्थन देऊन अर्मेनियाला नष्ट करायचे आहे. पाकिस्तान आणि तुर्की या देशांनी हे स्पष्ट केलं आहे. फ्रान्सनेही कबूल केले आहे की तुर्कस्तानने सीरियामध्ये लढाऊ हजारो जिहादी सैनिकांना अझरबैजानच्या वतीने लढण्यासाठी पाठवले आहे.
नागोर्नो-काराबाख वर ताबा मिळवण्यासाठी सुरु झालेल्या या युद्धाचा परिणाम अर्मेनिया आणि अजरबैजानच्या इतर शहरांवर देखील होत आहे. दोन्ही देश एकमेकांच्या नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप करत आहे. अजरबैजान किलर ड्रोनने अर्मेनियाच्या टँकला लक्ष्य करत आहे. तर अर्मेनिया मिसाईल हल्ले करुन अजरबैजानचे टँकला लक्ष्य करत आहे.