जिवन-मरणाच्या दारात लटकलेल्या चिमुकलीला वाचवण्यासाठी तरुणाची धाव आणि... पाहा व्हिडीओ

एवढच नाही तर हा व्यक्ती इमारतीच्या सहाव्या मजल्यावर कोणत्याही उपकरणाच्या मदती शिवाय चढला

Updated: May 26, 2022, 09:09 PM IST
जिवन-मरणाच्या दारात लटकलेल्या चिमुकलीला वाचवण्यासाठी तरुणाची धाव आणि... पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकवत आहे. या व्हिडीओमध्ये उंच इमारतीच्या खिडकीला एक लहान मुलगी लटकत आहे आणि एक व्यक्ती तिला वाचवण्यासाठी धावून आला. एवढच नाही तर हा व्यक्ती इमारतीच्या सहाव्या मजल्यावर कोणत्याही उपकरणाच्या किंवा सेफ्टीच्या मदती शिवाय चढला आणि त्याने या मुलीला वाचवले.

ही संपूर्ण घटना घडत असताना ती कोणीतरी आपल्या कॅमेरात कैद केली. हा पराक्रम केल्यानंतर त्या धाडसी व्यक्तीचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. चीनच्या शांक्सी प्रांतात ही घटना घडली, जिथे 5 वर्षांची मुलगी खिडकीतून खाली पडल्यानंतर लटकत राहिली.

सुरक्षा ग्रील्समध्ये अडकलेली मुलगी जोरजोरात ओरडू लागली. तेव्हा शेजारील एन पेंग नावाच्या व्यक्तीने मुलीची वेदनादायक किंकाळी ऐकली, म्हणून तो तिला वाचवण्यासाठी घटनास्थळी धावला.

एन पेंगने त्याच्या सुरक्षिततेची काळजी न करता, निवासी ब्लॉकसमोरील सुरक्षा पट्टीचा वापर करून इमारतीच्या बाहेर चढण्यास सुरुवात केली, असे पीपल्स डेली ऑनलाइनने वृत्त दिले आहे.

तो माणूस सहाव्या मजल्यावर पोहोचताच त्याने खिडकीच्या ग्रीलला लटकलेल्या चिमुरडीला पकडून 10 मिनिटे तिला तेथून वाचवण्याच प्रयत्न केला. त्यानंतर मुलीच्या आईने घटनास्थळ गाठून मुलाला सुखरूप खाली आणण्यास मदत केली.

त्या व्यक्तीने सरकारी मीडिया आउटलेट पीपल्स डेलीला सांगितले, 'ती खूप घाबरली होती आणि रडत होती, तेव्हा मी तिला पाहिले आणि घाबरु नकोस असे सांगितले. तसेच मी तिला हे देखील सांगितले की, मी तिला वाचवण्यासाठी येत आहे.'

आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी त्या भल्या माणसाचे खूप कौतुक केले. नेटिझन्सनी त्या व्यक्तीचे धैर्य आणि निस्वार्थीपणाबद्दल आभार मानले.

हा व्हिडीओ युट्यूबवर People Daily China नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे. त्यावेळी एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'एका खऱ्या हिरोने तिला वाचवले. देव त्याचं भलं करो.'