Vladimir Putin Property : इलॉन मस्क (Elon Musk) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत राजकीय नेता थेट इलॉन मस्कला टक्कर देत आहे. हा पृथ्वीवरील शक्तीशाली आणि श्रीमंत राजकीय नेता आहे. 200000000 इतकी संपत्ती असलेल्या या नेत्याकडे 700 कार, 58 विमानं, 20 महल आणि बरचं काही आहे. जाणून घेऊया हा नेता कोण?
पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत नेत्याचे नाव व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) असे आहे. जगातील सर्वात शक्तीशलाी नेता अशी व्लादिमीर पुतिन यांची ओळख आहे. व्लादिमीर पुतिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. व्लादिमीर पुतिन यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये केली जाते. पुतिन यांना वर्षाला 14,0000 डॉलर (सुमारे 11.7 कोटी) पगार मिळतो.
2007 मध्ये अमेरिकेच्या सिनेट न्यायपालिकेला सादर केलेल्या अहवालात पुतिन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यांच्याकडे 200 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. मात्र, 2015 मध्ये फोर्ब्स मासिकाने पुतीन यांच्या मालमत्तेची पडताळणी करता येत नाही, त्यामुळे त्यांचे नाव श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट करणे कठीण असल्याचे म्हटले होते. व्लादिमीर पुतिन ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग, ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन आणि फ्रान्सचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नल्ट यांच्यापेक्षा श्रीमंत असल्याचा दावा केला जातो.
अमेरिकेतील प्रतिष्ठित मासिक 'फॉर्च्युन'च्या अहवालात पुतिन यांच्याकडे 20 पेक्षा अधिक अलिशान महल आणि सुमारे 700 कार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासह 58 खाजगी विमाने आणि 'द फ्लाइंग क्रेमलिन' नावाचे हेलिकॉप्टरही आहे.
पुतिन यांच्याकडे 900 कोटी रुपयांहून अधिक किमतीची भव्य नौका आहे. शेहेराजादे असे या नौकेचे नाव आहे. पुतिन यांना लक्झरी घड्याळांची खूप आवड आहे. त्याच्याकडे असंख्य घड्याळे आहेत, ज्यांची किंमत 60 हजार ते 5 लाख डॉलर्सपर्यंत आहे.
काळ्या समुद्राच्या काठावर 190,000 चौरस फुटांवर एक आलिशान महालासारखे घर आहे. या बंगल्याची किंमत 1 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी आहे. पुतीन यांच्या या राजभवनात एक भूमिगत बंकरही आहे. याशिवाय पूल, जिम, कॅसिनो, सिनेमा हॉल अशा सुविधाही आहेत. यासह पतिन यांच्याकडे घोस्ट ट्रेन देखील आहे. 22 कोच असलेली ही ट्रेन पूर्णपणे बुलेट प्रूफ आहे, अगदी तिचे दरवाजे आणि खिडक्याही बुलेट प्रूफ आहेत. या ट्रेनमध्ये हॉस्पिटल देखील आहे.