काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. यावेळी रॉकेट हल्ला करण्यात आला.
विमानतळाच्या परिसरात तब्बल २० ते ३० रॉकेटस डागण्यात आलेत. अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांचे काबूल विमानतळावर आगमन झाल्यानंतर काहीवेळातच हा प्रकार घडला.
विमानतळाजवळील नाटोच्या लष्करी तळाला लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात आलेय. या हल्ल्यानंतर या विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आलीत.
5 members of a family wounded as the rockets fired on #KabulAirport hit a civilian house: Kabul police pic.twitter.com/eh2FiWoBhF
— Zakarya Hassani (@ZHassani7) September 27, 2017
तसेच संपूर्ण परिसर निकामी करण्यात आला आहे. या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. तसेच हल्लाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.