लंडन : अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल आणि ब्रिटिशचा राजपुत्र प्रिन्स हॅरी 19 मे 2018 रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या लंडनच्या राजघराण्यात लवकरच दोन गोड आणि मोठ्या बातम्या येणार आहेत. त्यामुळे लगबग सुरू झाली आहे.
प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचं आमंत्रण 600 खास निमंत्रित पाहुण्यांना देण्यात आलं आहे. राजघराण्याच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून त्यांच्या लग्नपत्रिकेची खास झलक दाखवण्यात आली आहे.
Lottie Small, who recently completed her apprenticeship, printed all of the invitations in a process known as die stamping, on a machine from the 1930s that she affectionately nicknamed Maude. pic.twitter.com/kWs2RFx7nN
— Kensington Palace (@KensingtonRoyal) March 22, 2018
मेगन मार्कल ही मूळची अमेरिकन आहे. आता मेगन लंडनच्या राजघराण्याची सून होणार आहे. त्यामुळे अमेरिका आणि लंडन या दोन्ही संस्कृतींचा मेळ घालत त्यांची लग्नपत्रिका बनवण्यात आली आहे.
ट्विटर हॅन्डलवर दिलेल्या माहितीनुसार लग्नाचं कार्ड हे लंडनचं असून त्यावर अमेरिकन काळ्या शाईने मजकूर लिहण्यात आला आहे. सोबतच या कार्ड्सवर सोन्यामध्ये राजघराण्याचा लोगो सजवण्यात आला आहे.
The invitations follow many years of Royal tradition and have been made by @BarnardWestwood. They feature the Three-Feathered Badge of the Prince of Wales printed in gold ink. pic.twitter.com/cd7LBmRJxO
— Kensington Palace (@KensingtonRoyal) March 22, 2018
एकीकडे प्रिन्स हॅरी आणि मेगेन मर्कलच्या लग्नाची धूम सुरू आहे तर दुसरीकडे प्रिन्स विल्यम आणि डचेस केट यांना एप्रिल 2018 मध्ये तिसरं अपत्य होणार आहे. नोव्हेंंबर 2017मध्ये प्रिंस हॅरी आणि मेगनचा साखरपूडा पार पडला.
जुलै 2016 साली प्रिंस हॅरी आणि मेगेनची ओळख कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून झाली आहे. त्यानंतर पुढे त्यांच्यामधील भेटी गाठी वाढत गेल्या. कालांतराने ते एकमेकांच्या प्रेमात पडल्याची कबुली त्यांनी एका मुलाखतीमध्ये दिली आहे. गेली दीड वर्ष ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते. कोण आहे मार्कल मेगेन ?