बलात्कारापासून वाचण्यासाठी बुरखा घालण्याचा सल्ला, इम्रान खान झाले ट्रोल

इम्रान खान यांचा जुना व्हिडीओ व्हायरल

Updated: Apr 5, 2021, 05:46 PM IST
बलात्कारापासून वाचण्यासाठी बुरखा घालण्याचा सल्ला, इम्रान खान झाले ट्रोल  title=

कराची : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी बलात्काराच्या (Rape) वाढत्या घटना रोखण्यासाठी महिलांना बुरखा घाला असा सल्ला दिला आहे. तेव्हापासून इम्रान खान यांना सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल केले जात आहे. त्यांच्या विधानाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

'ज्याप्रकारे फक्त कायदे करून कर भ्रष्टाचार संपत नाही, त्याच प्रकारे बलात्काराच्या घटना जनतेच्या सहकार्याशिवाय संपणार नाहीत' असे इम्रान खान म्हणाले. आम्हाला पडदा पध्दतीची संस्कृती वाढवावी लागेल जेणेकरून मोह टाळता येईल असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी अश्लीलतेसाठी भारत आणि युरोपला दोष दिलाय. दिल्लीला बलात्काराची राजधानी म्हणतात आणि युरोपमधील अश्लील गोष्टींनी त्यांची कौटुंबिक व्यवस्था उध्वस्त केली आहे. म्हणूनच पाकिस्तानच्या लोकांनी अश्लीलतेवर मात करण्यासाठी मदत केली पाहिजे, असे इम्रान म्हणाले.

व्हिडीओ व्हायरल

यानंतर फहद देशमुख नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर इम्रान खान यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ज्यामध्ये ते बीचवर बिकिनी पोशाख असलेल्या महिलेबरोबर आंघोळ करत आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'इम्रान खान बुरख्यावर व्याख्याने देत आहेत, पण स्वत: समुद्रकिनाऱ्यावर अशाच एका बिकिनी पोशाखीत बाईबरोबर आंघोळ करत आहेत.' इम्रान क्रिकेट स्टार असतानाचा हा व्हिडीओ आहे.

 

पाकिस्तानमधील बलात्काराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी इम्रान सरकारने कठोर कायदा बनविला आहे. या कायद्या अंतर्गत बलात्कारातील गुन्हेगारास औषध देऊन नपुंसक बनवता येऊ शकते. खटल्यांच्या सुनावणीसाठी देशभरात विशेष न्यायालये स्थापन केली जात आहे. ज्याची सुनावणी चार महिन्यांत पूर्ण करावी लागते. हा आदेश प्रथमच किंवा वारंवार बलात्काराच्या गुन्हेगारांना लागू होतो.