मुंबई : अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने आणखी एक मोठं यश मिळवलंय. काही दिवसांपूर्वी त्याच्या डबल एस्टेरॉयड रीडायरेक्शन टेस्ट (DART) मोहिमेचं अंतराळ यान Didymos लघुग्रहाभोवती फिरणाऱ्या Dimorphos या छोट्या लघुग्रहाशी आपटलं होतं. आता नासाने एका निवेदनात म्हटलंय की, त्या टक्करमुळे हा लघुग्रह दुसऱ्या कक्षेत ढकलला गेला आहे.
नासाच्या म्हणण्याप्रमाणे, डार्टने लघुग्रहाचा मार्ग यशस्वीपणे बदलला आहे. आता तो दुसऱ्या कक्षेकडे निघाला आहे. हे नासाचे एक महत्त्वाकांक्षी मिशन होतं. मानवतेसाठी हा एक ऐतिहासिक क्षण म्हणून मानला जाऊ शकतो.
DART मिशन अंतराळ यानाची लांबी 19 मीटर होती. म्हणजे साधारण बसपेक्षा पाच मीटर जास्त. डिमॉर्फोस या लहान लघुग्रहाशी ज्या अंतराळयानाची टक्कर झाली, तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट मोठा आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची लांबी 93 मीटर आहे. तर डिमॉर्फोस 163 मीटर आहे.
डार्ट मिशनचे हे यान सुमारे 10 महिन्यांपूर्वी पृथ्वीवरून सोडलं होतं. पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी ते जाणूनबुजून डिमॉर्फोस लघुग्रहाशी आदळले. 24,000 किमी प्रतितास वेगाने प्रवास करणाऱ्या डार्टची डिमॉर्फोसशी टक्कर झाल्याचे पाहायला मिळालं होतं.
यूएस स्पेस एजन्सी नासाचे 344 दशलक्ष डॉलर्सचं अंतराळयान पृथ्वीच्या क्षुद्रग्रहांच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यात गुंतलं होतं. याला डबल एस्टेरॉयड रिडायरेक्शन टेस्ट (DART) मिशन नाव देण्यात आलं. याच्या माध्यमातून पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहांची दिशा वळवण्याचं त्याचप्रमाणे त्यांना तोडण्याची टेक्निक पाहिली जात होती. नासाने याचं थेट प्रक्षेपणही केलं होतं.