मुंबई : मॉडेल आपल्या फोटोशूट करता काय काय करू शकतात याचा काही नेम नाही. फोटोशूट करता मॉडेलने जे पाऊल उचललं ते अतिशय धक्कादायक. जर्मनी (Germany)च्या एका मॉडेलला बिबट्यासोबत फोटोशूट करणं चांगलंच महागात पडलं आहे. फोटोशूट दरम्यान बिबट्याने मॉडेलवर हल्ला चढवला. हा हल्ला इतका भयानक होता की, त्या मॉडेलला मोठी दुखापत झाली आहे.
मॉडेल ज्या कॅमेऱ्याच्यासमोर वेगवेगळ्या पोझ देत होती. त्याच्या मागूनच बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवला आहे. हा हल्ला इतका जबर होता की, मॉडेलच्या चेहऱ्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली आहे. मॉडेलचं नशिब एवढं चांगलं होतं की, ती बिबट्याचया दाढेतून परत आली आहे. सध्या तरूणीला रुग्णालयात दाखल केलं आहे.
'द सन' रिपोर्टनुसार, मॉडेलचं नाव जेसिका लि़डॉल्फ (Jessica Leidolph)नाव आहे. 36 वर्षीय जेसिकाने अनेकदा असं फोटोशूट केलं आहे. मात्र यावेळी जे काही घडलं ते अतिशय धक्कादायक आहे. याचा कोणी विचारही केला नव्हता. ती फोटोशूट करता बिबट्याच्या पिंजऱ्यात घुसली.
ही घटना जर्मनीच्या पूर्व भागातील प्राणीसंग्रहालयात घडली आहे. जेथे सर्कशीतील निवृत्त प्राण्यांना ठेवण्यात येतं. जेसिका येथे एका फोटोशूट करता पोहोचली होती. या दरम्यान 16 वर्षांच्या ट्रोजा नावाच्या बिबट्या मादीच्या पिंजऱ्यात गेली. तेव्हा या मादीने तिच्यावर हल्ला केला. मादी बिबट्याने या हल्ल्यात गाल, कान आणि डोक्यावर चावलं. जखमी जेसिका घटनास्थळीच बेशुद्ध झाली. तिला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे तिच्यावर सर्जरी करण्यात आलं.