Russia's Luna-25 has crashed into the moon : रशियाच्या चांद्र मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. रशियाचे Luna-25 यान चंद्रावर क्रॅश झाले आहे. 19 ऑगस्टला Luna-25 यानाच्या ऑपरेटिंगमध्ये तांत्रिक बिघाड आला होता. आता रशियाचे Luna-25 यान चंद्रावर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियाची मून मोहिम देखील अंतिम टप्प्यात आली असताना यानच क्रॅश झाले आहे.
Russia's Luna-25 spacecraft has crashed into the moon, reports Germany's DW News citing space corporation Roskosmos pic.twitter.com/ZtxYkFHUp2
— ANI (@ANI) August 20, 2023
Luna-25 हे 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार होते. 19 ऑगस्टला दुपारी 14:10 वाजता रशियाच्या Luna-25 लँडरला प्री-लँडिंग ऑर्बिटमध्ये ढकलण्यासाठी अंतिम डी-बूस्ट करण्यात आले. मात्र, डी-बूस्टची कमांड या लँडरला मिळाली नाही. रशियाच्या यानाचे डी-बूस्ट होवू शकले नाही. Luna-25 कमांड नुसार काम करत नसल्याने या मोहिवर काम करणारी वैज्ञानिकांची टीम यान पुन्हा कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत होती. रशियन स्पेस एजन्सी Roscosmos ने याबाबतचे वृत्त दिले होते.
रशियाच्या मिशन लुना-25 मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. कक्षा बदलताना लुना-25 आपत्कालीन परिस्थितीत अडकले होते. लूना-25 कक्षा बदलण्याताना अयशस्वी झाल्याने त्यामुळे ते भरकटले. त्याचा मुळ मार्ग गमावला. रशियन स्पेस एजन्सी लुना-25 शी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.
रशियानं 47 वर्षांनंतर पहिल्यांदाच मून मिशन हाती घेतले होते. रशियाचे Luna-25 हे यान भारतीय वेळेनुसार 11 ऑगस्ट मध्यरात्री 3.30 वाजता अवकाशात झेपावले. रशियाची राजधानी मॉस्कोपासून पूर्वेला 5550 किमी अंतरावर असलेल्या व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथील अंतराळ केंद्रातून रशिया सोयुझ-2 सर्वात उंच आणि अत्यंत पावरफुल रॉकेटच्या मदतीने हे यान प्रक्षेपित करण्यात आले. Luna-25 लँडरला 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार होते.
चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 उतरण्यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत. मिशन मूनचा आणखी एक टप्पा पार करताना आज पहाटे 1.50 वाजता विक्रम लँडरचे यशस्वीरित्या डी-बूस्टिंग करण्यात आले. म्हणजेच चांद्रयान-3 चा वेग कमी करण्यात यश आले. इस्रोने या संदर्भात माहिती दिली. विक्रम लँडर चंद्रापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार असून, वेळही ठरली आहे. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी उतरणं अपेक्षित आहे.