तेहरान : पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र डॉनच्या बातमीनुसार इराणमध्ये प्राथमिक शाळांमध्ये इंग्लिश शिकवण्यावर बंदी घालण्यात आलीये.
वृत्तानुसार इस्लामिक नेत्यांच्या मते कमी वयात इंग्लिश शिकल्याने मुले वेस्टर्न संस्कृतीकडे आकर्षित होतात. इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी प्राथमिक शाळांमध्ये इंग्लिश शिकण्याविरुद्ध आवाज उठवला होता. त्यानतर इराणच्या वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांनी या बंदीबाबतची घोषणा केली.
इराणमध्ये पारसी ही प्रमुख भाषा आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून येथील मुलांचे प्राथमिक शिक्षणाचे वय सुरु होते. या देशात इंग्लिश अधिकतर माध्यमिक विभागांमध्ये शिकवला जातो. या विभागात १२ ते १४ वर्षातील वयोगटाच्या मुलांचा समावेश असतो. मात्र इराणधील काही प्राथमिक शाळांमध्येही इंग्लिश शिकवली जाते.
याबाबत बोलताना सरकारी उच्च शिक्षण परिषदेचे प्रमुख मेहंदी नवीन अदम म्हणाले, अधिकृत पाठ्यक्रमानुसार सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये इंग्लिश शिकणे कायद्याच्या विरोधात आहे.