मुंबई : गलवान खोऱ्यात (Galwan Valley) पुन्हा एकदा भारत आणि चीनमधील सैनिक आणि चीन यांच्यात झडप झाली असल्याचा दावा करणाऱ्या वृत्तांना भारतीय सैन्याने (Indian Army) खंडन केले आहे. यासंदर्भात भारतीय लष्कराने एक निवेदन जारी केले असून यासंदर्भातील परिस्थिती स्पष्ट केली आहे.
भारतीय सैन्याने (Indian Army) म्हटले आहे की, 'एका मीडिया रिपोर्टमध्ये गलवान खोऱ्यात (Galwan Valley) भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये आमने-सामने सामना झाला आहे. मात्र, याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, मे 2021 च्या पहिल्या आठवड्यात पूर्व लडाखच्या (Eastern Ladakh) गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये असा संघर्ष झाला नव्हता.
A media report suggested a minor face-off between Indian & Chinese troops in Galwan Valley. It is clarified that no such face-off has taken place between Indian and Chinese troops at Galwan Valley in Eastern Ladakh in the first week of May 2021 as reported: Indian Army
— ANI (@ANI) May 23, 2021
भारतीय सैन्याने (Indian Army)आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, 'हा अहवाल त्या स्त्रोतांनी प्रेरित असल्याचे दिसते आहे, जे पूर्वेकडील लडाखमधील (Eastern Ladakh) प्रश्नांच्या लवकर निराकरणासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेला रुळावर आणण्याचा प्रयत्न करू शकतात.' यासह लष्कराने असेही म्हटले आहे की सैन्य अधिकारी किंवा अधिकृत स्त्रोताने हा खुलासा होईपर्यंत माध्यमांनी कोणताही अहवाल प्रसिद्ध करु नये.
भारतीय सैन्याने (Indian Army)सांगितले की, '23 मे 2021 रोजी द हिंदूमध्ये प्रकाशित झालेल्या गलवान खोऱ्यामध्ये (Galwan Valley) चिनी सैन्यांसमवेत झडप, असे थळक वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याबाबत हे स्पष्ट केले आहे की, मे 2021 च्या पहिल्या आठवड्यात पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये असा संघर्ष झाला नव्हता. पूर्व लडाखमधील प्रश्नांच्या लवकर निराकरणासाठी प्रक्रिया सुरु आहे.