Viral Video : एका मिनिटात 7 कोटींच्या 5 लक्झरी गाड्या गायब

हा सगळा प्रकार फक्त 59 सेकंदात घडतो .कुणालाही या चोरीची साधी कुणकूणही लागली नाही.  

Updated: Dec 15, 2022, 11:14 PM IST
Viral Video : एका मिनिटात 7 कोटींच्या 5 लक्झरी गाड्या गायब title=

Viral Polkhol : आता बातमी आहे एका हायटेक चोरीची. फक्त 1 मिनिट, 6 चोर आणि 7 कोटींच्या कार. हे सगळं घडलं त्याची कुणालाही भनक लागली नाही. चालता बोलता यांनी 7 कोटींच्या कार लंपास केल्या. ही हायटेक चोरी (Thief) पाहून तुम्हीही हैराण व्हाल. अलिशान कारची (Car) चोरी पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. या चोरांनी या कार कशा लंपास केल्या चला पाहुयात. (fact check viral polkhol luxary car thief video viral on social media)

फक्त 1 मिनिट, 6 चोर आणि 7 कोटींची चोरी. बॉलिवूड चित्रपटाच्या एखाद्या कथानकाला लाजवेल अशी ही चोरी. व्हीडिओ पाहिल्यावर वाटेल की हे खरंच चित्रपटाचं शुटिंग सुरूये. पण, तसं नाहीये.हे चोरटे इतके सराईत आहेत की यांनी चोरीसाठी हायटेक पद्धत वापरली. यामुळे पोलीसही हैराण झालेयत. बघा, हे सगळे चोरटे आधीच कारचं लॉक तोडून कारमध्ये बसलेयत. यांच्यातला एक चोरटा गेट उघडण्यासाठी खाली उतरला. आणि गेट उघडताच पाच चोरटे कार गेटबाहेर घेऊन जातात आणि गेट उघडणारा चोरटा मग धावत धावत जाऊन पुढे उभ्या असलेल्या कारमध्ये बसून पसार होतो. 

हा सगळा प्रकार फक्त 59 सेकंदात घडतो .कुणालाही या चोरीची साधी कुणकूणही लागली नाही. पण, या चोरलेल्या कार सापडल्या का? ही चोरीची घटना कुठली आहे ते आपण पाहणारच आहोत. त्याआधी चोरलेल्या कार कोणत्या आणि त्यांची किंमत किती आहे त्यावर एक नजर टाकूया.

1 मिनिटात 7 कोटींच्या कार लंपास

एरियल अॅटम रेसिंग कार - 55 लाख
मर्सिडीज A45 AMG 4 मेटिक - 84 लाख
पोर्शे कॅन्ने-  1 कोटी 93 लाख
पोर्शे 911 कॅरेरा-  1 कोटी 72 लाख
मर्सिडीज मेबॅक-  2 कोटी 50 लाख

या महागड्या कार चोरीला गेल्यायत. कारची किंमत कळाली. पण, ही चोरी कुठे झालीय याचा शोध घेतला त्यावेळी काय सत्य समोर आलं ते पाहुयात.

व्हायरल पोलखोल

चोरीची घटना इंग्लंडच्या एक्सेस काउंटीमधील आहे. बुफलान गावातल्या ब्रेंटवूड रोडवरील कॅम्पसमध्ये चोरी झाली. अलिशान 5 कारपैकी फक्त 1 कार सापडली. अडीच कोटींची मर्सिडीज मेबॅक कार शोधण्यात यश आलंय. आता या इतर कार शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी 1 महिना लोटूनही कार सापडत नसल्याने लोकांना आवाहन केलंय. जर या कार इंग्लंडच्या पोलिसांना सापडल्या नाहीत तर मुंबई पोलिसांची मदत घ्या असं नेटकरी म्हणतायत.