नवी दिल्ली : तुम्ही कधी ह्रदय हलताना पाहिलय का ? मान आणि पोटाच्या मध्यभागातून ह्रदय बाहेर येताना बघितलय का? एका चिमुरडीचा जन्मच अशा दुर्मिळ परिस्थितीतील आहे. याला पेंटालजी ऑफ कैंट्रल असे म्हणतात. डायाफ्राम, ओटीपोट भिंती, पेरीकार्डियम, हृदयाशी निगडीत जटिलता आढळते.
अशा दुर्मिळ परिस्थितीत जन्म झाला आहे. यास सेंट्रलच्या पेंटलिया असे म्हणतात, जेथे ७ वर्षाच्या विरसेवय बॉरन हिला या अवघडपणाचा सामना करावा लागत आहे. तिच्या छातीवर हृदयाचे ठोकेस्पष्टपणे पाहायला मिळतात.
'VirsaviyaWarrior' नावाने एक व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे.
ती चिमुरडी जेव्हा हसते तेव्हा हृदयाची धडधड शरीरापेक्षा अधिक वेगाने होत असताना दिसते.
या ४३ सेकंदाच्या व्हिडिओत दिसते की तिचे हृदय बारीक त्वचेच्या थराने गुंडाळले गेले आहे. याही परिस्थितीत ती हसतेय आणि त्याच्याशी खेळतेय. मूळता रशियाची असणाऱ्या या मुलीचा परिवार सध्या अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये रहात आहे. ही मुलगी सर्वसामान्य मुलींपेक्षा थोडा वेगळी दिसते पण तिच्या वयाच्या मुलींप्रमाणे चालत बोलत असते.
बाळ जास्त काळ जगणार नाही असे तिच्या आईला डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे चांगल्या उपचारासाठी त्यांनी आपले कुटुंब फ्लोरिडा येथे हलविले.जगातील अनेक रुग्णालयांनी या चिमुरडीवर उपचार करण्यास नकार दिला. परंतु आई डेरी बोरानने आशा सोडली नाही. असे सांगितले जाते की, या ऑपरेशनमध्ये धोका खूप जास्त आहे. उच्च रक्तदाबांमुळे बोस्टन येथील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे.
या मुलीचे आतडे देखील शरीरावेगळे दिसते. अशा दुर्मिळ परिस्थितीची सरासरी १० लाख मुलांमध्ये ५.५ एवढे आहे. तज्ञ म्हणतात की अशी मुले जन्मताच मरतात किंवा जास्त काळ जगत नाहीत.