हवेत उड्डाण करतानाच मधल्यामधेच गायब होतायत विमानं; यंत्रणाही चिंतेत

DGCA Alert to Airlines : विमानप्रवास अनेकांनाच हवाहावासा वाटतो. पण, हाच विमानप्रवास अनेकांसाठी धोक्याचासुद्धा ठरतो. सध्या याच प्रवासाविषयी एक भलतीच चिंता सतावतेय...काय आहे ती? पाहा 

सायली पाटील | Updated: Nov 24, 2023, 05:21 PM IST
हवेत उड्डाण करतानाच मधल्यामधेच गायब होतायत विमानं; यंत्रणाही चिंतेत title=
DGCA Alert to Airlines an many airplanes loosing their signals latest update

DGCA Alert to Airlines : विमान प्रवासामुळं प्रचंड वेळ वाचत असला तरीही या प्रवासादरम्यान आजवर घडलेले अपघात पाहता अनेकांच्यात मनात विमानात बसाचं म्हटलं की भीती निर्माण होते. ही भीती कधीकधी इतकी वाढते की काही मंडळी विमानानं प्रवास करणंच टाळतात. नुकतीच या विमानप्रवासाशी संबंधित एक अशीच माहिती समोर आली आहे, जी वाचून यंत्रणांचीही चिंता वाढली आहे. कारण प्रवास सुरु असलानाच आकाशातून विमानं गायब होऊ लागली आहेत. 

हे खरंच घडतंय? 

मध्य पूर्व प्रांतामध्ये उड्डाण घेत आकाशात झेपावलेल्या विमानांची दिशा अचानकच भरकटू लागली आहे. विमानांसोबत सातत्यानं घडणाऱ्या या प्रकाराबद्दल आता डीजीसीएनंही चिंता व्यक्त केली आहे. किंबहुना सिविल एविएशनच्या विमानांना मध्यपूर्वेच्या दिशेनं उड्डाण घेण्याबाबत डीसीजीएनं काही मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. 

घडल्या प्रकारानंतर समोर आलेल्या माहितीनुसार सध्या मध्य पूर्व ( Middle East) प्रांतामध्ये असणारं एअर ट्रॅफिक एरिया सिविल एविएशनसाठी मोठा धोका निर्माण करताना दिसत आहे. हा धोका बळावताना पाहून आता विमान कंपन्यांना सतर्क करण्यात आलं आहे. 

हेसुद्धा वाचा : कोट्यधीश व्हायचंय? आतापासूनच सुरु करा Investment; वापरा हा सोपा मंत्र 

भारतातून जी विमानं middle east च्या दिशेनं झेपावत आहेत त्या सर्वांच्या दिशादर्शकामध्ये बिघाड होत असून, यंत्रणेवर विमानं दिसेनासी होत आहेत. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीनं हा मोठा धोका असल्याचीच खळबळजनक बाब आता सर्वांनाच हादरा देत आहे. परिणामी विमानसेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नव्यानं डोकं वर काढलेला हा धोका आणि जीएनएसएस (ग्लोबल नेविगेशन सॅटेलाइट सिस्टम)  जॅमिंग आणि स्पुफिंगच्या अहवालांमुळं सध्या हवाई मार्गानं सुरु असणाऱ्या वाहतुकीमध्ये या अडचणी निर्माण होताना दिसत आहेत.  ज्यावेळी विमानांची दिशा भरकटते अशा वेळी पर्यायी उपाययोजनांची तयारी ठेवणं अतिशय महत्त्वाचं असल्याची गरजही डीजीसीएनं स्पष्ट केली.  

कुठं भरकटताहेत विमानं? 

वाचून हैराण व्हाल, पण सप्टेंबरच्या अखेरीस ईराणनजीक असताना अनेक खासगी विमानांची दिशादर्शक प्रणाली बंद होऊन विमानांमध्ये तांत्रिक अडचणी आल्याची बाब समोर आली होती. ऑप्सग्रुपच्या माहितीनुसार प्रशिक्षित वैमानिक, फ्लाईट डिस्पॅचर्स, शेड्यूलर्स आणि नियंत्रकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. मुळात विमानांनी दिशा भरकटल्यानंतर मोठ्या अपघाताची भीती असते. त्यामुळं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबत नेमकी कशी दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.