कसाईवर गाईचा पलटवार...फरफटत त्याला घेऊन गेली आणि... पाहा Video

या व्हिडीओमध्ये गायीने कसायाचा जो हाल केला ते पाहून अंगावर काटा येईल.

Updated: Jul 14, 2022, 11:56 AM IST
कसाईवर गाईचा पलटवार...फरफटत त्याला घेऊन गेली आणि... पाहा Video title=

Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक, संतापजनक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून यूजर्सही निशब्द होतात. मोबाईल आणि सीसीटीव्हीच्या युगात अनेक घटना आता कॅमेऱ्यात कैद होतात. तर सोशल मीडियामुळे ते देशभरात व्हायरल होतात. अशीच एक धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

काय केलं गायीने कसायासोबत?

या व्हिडीओमध्ये गायीने कसायाचा जो हाल केला ते पाहून अंगावर काटा येईल. या व्हिडीओत सर्व घटना कैद झाली आहे. नेमकं झालं असं की, कसाई गायीला निर्दयपणे ओढत होता. त्यावेळी या गायीने कसायालाच हिस्सा दाखवला.  

कसाई गायीला क्रूरपणे ओढत असताना गायीच्या दोरीत कसायाचा पाय अडकला आणि त्यानंतर जे काही घडलं ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या घटनेच्या वेळी तिथे स्थानिक लोकं पण उपस्थित होते. ही गाय कसायाला दूरपर्यंत फरफटत घेऊन गेली. ही घटना पाहून उपस्थित लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

कुठे घडली ही घटना?

ही घटना पाकिस्तानमधली आहे. कराचीच्या गुलिस्तान ए जौहर परिसरातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गायीला कुर्बानीसाठी घेऊन जात असताना कसायावरच कुर्बानीची वेळ आली. व्हिडिओमध्ये चार जण गायीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी गायीने रौद्र अवतार घेतला आणि कसायाला जमिनीवर फरफटत काही अंतर घेऊन गेली. या कसायाला वाचवण्यासाठी इतर लोकं या गायीच्या मागे पळत होती.  

काय झालं त्या कसायाचं?

ही घटना CCTV कैद झाली आहे. तर या CCTVमध्ये तो कसाई घटनास्थळापासून काही दूर अंतरावर बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याचा बाजूला स्थानिक लोकं उपस्थित होते. भारतात गायीला देवाचं रुप मानलं जातं. त्यामुळे सोशल मीडियावर यूजर्सकडून संतापजनक कंमेट्स येत आहे.