हाँगकाँगच्या कुत्र्याला कोरोना व्हायरसची लागण?

हाँगकाँगमध्ये कुत्र्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र कोरोना व्हायरसची

Updated: Feb 29, 2020, 07:33 PM IST
हाँगकाँगच्या कुत्र्याला कोरोना व्हायरसची लागण? title=

हाँगकाँग : हाँगकाँगमध्ये कुत्र्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र कोरोना व्हायरसची लागण 'वीक पॉझिटीव्ह' असल्याचं सांगण्यात येत आहे. पण अजूनही या कुत्र्याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, किंवा नाही हे स्पष्ट झालेलं नाही. कारण या कुत्र्याला झालेली लागण अजून एवढी प्रभावी नसल्याचंही सांगण्यात येत आहे. 

या कुत्र्याच्या मालकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोरोना हा व्हायरस प्राण्यांकडून माणसांकडे आला असं सांगतात, आता माणसांकडून माणसांत या व्हायरसचं संक्रमण होत आहे.

दुसरीकडे या कुत्र्याला या व्हायरसची लागण माणसाकड़ून होवू शकते का? यावरही चर्चा सुरू आहे. शिंकताना संसर्गजन्य रोग पसरतात. या प्रकारेच या कुत्र्याला देखील संसर्ग झाला असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

या कुत्र्याची कोरोना टेस्ट जोपर्यंत निगेटीव्ह येत नाही. तोपर्यंत या कुत्र्यावर उपचार सुरू राहणार आहेत. हाँगकांगच्या अॅग्रीकल्चर, फिशरी आणि कन्जर्वेशन डिपार्टमेंट प्रेस रिलीज जारी केली आहे. यात त्यांनी म्हटलंय की अजून कोणताही पुरावा आमच्याकडे नाही की कुत्र्यांमध्ये मानवाकडून कोरोना पसरतोय किंवा नाही.

हाँगकाँगमध्ये आतापर्यंत ९३ लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यापैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे.