Indian Chinese Couple Marriage Story : देशभरात लग्नाचा माहोल सूरू आहे. प्रत्येक ठिकाणी ढोल-नगाडे वाजतायात, लग्नाच्या वराती निघतायत. अशात लग्नाच्या काही हटके स्टोरी समोर येत असतात. अशीच एक स्टोरी समोर आली आहे. या घटनेत एका चीनी तरूणीने भारतीय तरूणासोबत (Indian Chinese Couple) लग्नगाठ बांधलीय. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा आहे.
गेल्या काही वर्षापासून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक सूरू आहे. आता अरूणाचल प्रदेशच्या तवांग सेंक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन्ही देशाचे जवान जखमी झाले होते. अशात दोन्ही देशात तणावाचे वातावरण असताना एका चीनी भारतीय कपलची (Indian Chinese Couple) लव्हस्टोरी चर्चेत आली आहे. या लव्हस्टोरीची एकच चर्चा आहे.
लोकेश हा छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला लहानपणापासून योगाची आवड होती. त्यामुळे त्याने योगशास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेण्यासाठी तो हरिद्वारला गेला होता. योगशास्त्रात पदवी घेतल्यानंतर तो नोकरीसाठी दिल्लीला गेला. या दरम्यान त्याला चीनमधील एका भारतीय संस्थेत योग शिक्षकाची जागा रिक्त असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार त्याने अर्ज केला आणि त्याची निवड झाली होती.
चीनच्या योग संस्थेत रूजू झाल्यानंतर लोकेश यांची भेट चीनच्या होउ जोंगशी झाली. होउ जोंग ही लोकेशची विद्यार्थीनी होती. या दरम्यान योग शिकवताना होउ जोंग लोकेशच्या प्रेमात पडली होती.
होउ जोंग हिने स्वत: लोकेशला प्रपोज केले होते. त्यानंतर लोकेशने तिला होकार दिला होता. मध्यंतरी त्यांच्यात ब्रेकअपही झाले होते.या ब्रेकअप बाबत लोकेश म्हणाला की, एकदा त्याचे होउ जोंगसोबत ब्रेकअप झाले होते, कारण होउ खूप भांडखोर स्वभावाची होती. पण जेव्हा तो भारतात परतलो तेव्हा तिला त्याची खूप आठवण आली. तिने व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर त्याला मेसेज केले होते. अशा परिस्थितीत त्यांनी होउला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला.
लोकेशने तिला आणखीण एक संधी दिली आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. लोकेश गेल्या 6 वर्षांपासून चीनमध्ये आहे. 2019 मध्ये त्यांनी लग्न केले होते. या लग्नात सहभागी होण्यासाठी लोकेशचे वडील चीनमधून भारतात आले होते. नंतर पुन्हा हे जोडपे भारतात आले आणि त्यांनी देशाच्या अनेक भागांना भेटी दिल्या.
लोकेशने त्याच्या युट्यूब चॅनेलवर या लग्नाची संपुर्ण कहानी सांगितली आहे. त्यात आता या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगलीय.