मॉस्को : केवळ धक्कादायकच नव्हे तर, केवळ कहाणी ऐकून अंगावर रोमांच उभा राहतील आणि भीतीने सर्वांगाला घाम सुटेल असा प्रकार पुढे आला आहे. रशियातील एका नरभक्षी जोडप्याने तब्बल १८ जणांना मारून खाल्लं आहे. इतकेच नव्हे तर, हे जोडपे मांनवी मांसाचे लोणचे घालून ते फ्रिजमध्ये ठेवत असे.
पोलिसांनी या नरभक्षी जोडप्याला ताब्यात घेतले असून, जोडप्याला त्यांचा गुन्हा कबूल आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या जोडप्याच्या घरातून ८ व्यक्तींच्या शरीराचे भाग मिळाले आहेत. हे जोडपे इतके विकृत होते की, ते लोकांना जीवे मारत असत आणि त्यांच्या मृतदेहासोबत सेल्फी घेत असत. हा प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
हे जोडपं रशियाच्या दक्षिण भागात राहणारे आहे. जोडप्यातील पती हा ३५ वर्षांचा असून, दिमित्री बाकेशेव असे त्याचे नाव आहे. तर, नतालिया असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. बाकेशेव हा पेशाने वकील आहे. १९९९ पासून हा प्रकार आपण करत असल्याची माहिती बाकेशेवने दिली आहे.
रशियातील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बाकेशेव आणि त्याच्या पत्नी मानवी मांसाचे लोणचे घालत असे. तसेच, हे लोणचे आणि मांस फ्रिज आणि तळघरात साठवून ठेवत असे. रशियन इन्वेस्टिगेशन कमिटीने केलेल्या संशोधनात पोलिसांना १९ मानवी कवट्या मिळाल्याचे म्हटले आहे.
असा झाला प्रकरणाचा भांडाफोड
आरोपी बाकेशेव आणि त्याची पत्नी नतालिया हे मिलिटरी अॅकेडमीत काम करत होते. दरम्यान, क्रास्नोडारमध्ये एक मोबाईल सापडला. ज्यात मृतदेहांसोबत काढलेले सेल्फी खचाखच भरले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात हा मोबाईल बाकेशेवचा असल्याचा आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करता हा धक्कादायक प्रकार समोर आला.