Crocodiles Attack : मगरीचा (Crocodiles) नुसता विचार जरी केला की अनेकांच्या घशाला कोरड पडते. मगरीच्या नावाने भलेभले घाबरून जातात. पण हीच मगर जर समोर आली तरी अनेक जण कल्पनाही करु शकत नाही. सर्वात धोकादायक अशा या मगरीच्या तावडीत कोणी सापडलं तर त्याची सुटका अशक्यचं आहे. जर मगरीच्या समोर कोणी गेले तर ती शिकार सोडत नाही. लांबूनच मगरीला पाहून अनेकांना भीती वाटते. पण जर एखादी व्यक्ती या मगरीसमोर पडली तर त्याचा काय होईल याचा विचारही न केलेला बरा. कंबोडियात (cambodia) 40 मगरींनी एका वृद्धावर हल्ला करुन त्याला फाडून खाल्ल्याचे समोर आले आहे.
कंबोडियात 40 मगरींनी एका 72 वर्षांच्या वृद्धाला ओरबाडून ठार केले. वृद्धाच्या शरीराचे मगरीने अनेक तुकडे केले होते. वृद्धाला मगरींनी ओरबाडल्याने मोठा रक्तस्त्राव झाला होता. एका मगरीला हाकलण्यासाठी ही वृद्ध व्यक्ती शेतात गेली होती. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. ही वृद्ध व्यक्ती काठीच्या सहाय्याने मगरीला दूर करत होता. पण ती व्यक्ती अचानक 40 मगरीच्या मधोमध पडला आणि त्यानंतर त्याचा वेदनादायक मृत्यू झाला.
सीम रीप कम्युनचे पोलीस प्रमुख मे सॅव्हरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 72 वर्षीय लुआन नम हे एका शेतातील पिंजऱ्यातून मगरीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. वृद्धाला पाहताच एका मगरीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ओढत घेरून आत नेले. त्यानंतर मगरींचा संपूर्ण गट तेथे आला. काही वेळातच मगरींनी लुआन यांच्या शरीर तुकडे केले. एका मगरीने अंडी घातली होती आणि लुआन त्या मगरीला काठीने काढण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान मगरीने लुआनची काठी तोंडात पकडली आणि असा धक्का दिला की लुआन खाली पडले.
वृध्दाच्या मृतदेहाचे फक्त काहीच भाग तिथे उरला होता. नंतर तो भाग बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, मगरींनी ज्या आवारात वृद्धाला ठार मारले ते त्याच्याच कुटुंबाचे शेत होते. एएफपीच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितले की, "जेव्हा वृद्ध व्यक्ती अंडी देणाऱ्या मगरीचा पाठलाग करत होते, तेव्हा मगरीने वृद्धाच्या काठीवर हल्ला केला, ज्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर तिथे आलेल्या इतर मगरींनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या शरीराचे तुकडे केले."
मगरींनी लुआन यांचे दोन्ही हात आणि एक पाय गिळला होता. डोक्यापासून पायापर्यंत फक्त जखमा होत्या. हे दृश्य पाहून मदत करणारेही हादरले होते. लुआन यांच्या शरीरावर जखमांच्या इतक्या खुणा होत्या की त्या मोजणे कठीण होते. कंबोडियामध्ये मगरी व्यवसायाच्या उद्देशाने पाळल्या जातात. त्यांचे मांस, अंडी आदींची विक्री केली जाते. कंबोडियामध्ये मगरींचे फार्म मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना पाहण्यासाठी लांबून लोक येतात. दुर्दैवाने मृत लुआन हे क्रोकोडाइल असोसिएशन ऑफ कंबोडियाचे अध्यक्ष होते.