Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा बिग बींचा मुलगा असला तरी त्यांनी स्वत: चं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. तरी सुद्धा अनेकदा त्याची तुलना ही त्याचे वडील अमिताभ बच्चन यांच्याशी करण्यात येते. त्याशिवाय अनेकदा त्याची तुलना ही पत्नी ऐश्वर्या रायसोबत देखील करण्यात येते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकनं कुटुंबासोबत होणाऱ्या तुलनेविषयी त्याला काय वाटतं आणि त्यासोबत आराध्या बच्चनविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
अभिषेक बच्चननं नुकतीच CNBC-TV18 ला मुलाखत दिली. या मुलाखतीत संपूर्ण कुटुंबाला मिळालेलं यश आणि कामगिरी यांच्यावर परिणाम होतो असा प्रश्न विचारण्यात आला तर अभिषेक म्हणाला, 'गेल्या 25 वर्षांपासून हे प्रश्न विचारण्यात आले आणि आता त्याचा माझ्यावर परिणाम होत नाही. जर तुम्ही माझी तुलना माझ्या वडिलांशी करत असाल तर तुम्ही माझी तुलना ही सगळ्यात बेस्ट असलेल्या व्यक्तीशी करत आहात. जर तुम्ही माझी तुलना सर्वोत्कृष्ट व्यक्तीशी करत असाल तर कुठे ना कुठे मला वाटतं की ही या महान लोकांच्या नावांमध्ये माझं नाव घेतलं जाऊ शकतं यासाठी मी पात्र आहे.'
अभिषेक पुढे म्हणाला की 'मी या सगळ्याकडे अशा प्रकारे पाहते की माझे आई-वडील, माझे आई-वडील आहेत. माझं कुटुंब, माझं कुटुंब आहे आणि माझी पत्नी ही माझी पत्नी आहे. त्यामुळे मला त्यांच्यावर किंवा त्यांच्या कामगिरीचा, त्यांनी केलेल्या कामावर खूप अभिमान आहे.'
पुढे वडील अमिताभ बच्चन यांच्यासाठी म्हणाली की 'आम्ही इथे मुंबईत एसीच्या रूममध्ये बसून कॉफी पितोय. तिथे 82 वर्षांची व्यक्ती सकाळी 7 वाजेपासून केबीसीचं शूटिंग करत आहे. हे एक आदर्श ठरत आहेत. मला देखील असंच बनायचं आहे. जेव्हा मी रात्र झोपायला जातो तेव्हा हाच विचार करतो आणि समजून घेतो की जेव्हा मी 82 वर्षांचा होतो तेव्हा माझी मुलगी माझ्या विषयी हे बोलू शकते की माझे वडील 82 व्या वर्षांचे झाले आहेत आणि ते अजूनही काम करत आहेत.'
हेही वाचा : Free मध्ये Paatal Lok 2! रिलायंस जियोच्या 'या' ऑफरमुळे 49 कोटी यूजर्सना होणार फायदा
पुढे अभिषेक त्याच्या आध्यात्माकडील प्रवासाविषयी बोलताना म्हणाला की, 'आज मी जे काही आहे, ते माझ्या कुटुंबामुळे आहे. मी जे काही करतो, ते कुटुंबासाठी करतो. त्यांचं मत माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला माझ्या नावावर गर्व आहे, हे नाव मला माझ्या आजोबांनी दिलं होतं. पण मला त्या आडनावावर जास्त गर्व आहे, जे त्यांनी आम्हाला दिलं आहे आणि आशीर्वादसोबत आमच्यासोबत आहे. आजोबांमुळे आम्हाला प्रेम मिळाल आहे, ते पुढे तसंच मिळत राहण्यासाठी मी काम करणार. मला आशा आहे की माझी लेक आणि येणारी पिढी या सगळ्याचा सन्मान करतील आणि त्यांचे देखील हेच विचार असतील.'