मुंबई: सोशल मीडियावर सर्वात जास्त वापरलं जाणारं अॅप हे Whatsapp आहे. अगदी कामापासून ते मित्र-मैत्रिणींशी संवाद साधण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. Whatsapp आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग झाला आहे. Whatsapp वेगवेगळे फीचर्स आपल्या ग्राहकांसाठी आणत असतं. आता नवीन फीचर आणलं आहे. ज्यामुळे युझर्सना आता प्रश्न पडणार आहे की नेमका रंग कोणता.
Whatsapp चा अनुभव युझर्ससाठी अधिक आनंददायक आणि मनोरंजक करण्यासाठी व्हॉट्सअॅप वारंवार अॅप अपडेट करत राहतो. अलीकडेच अॅपमध्ये अपडेट केल्यानंतर बरेच मोठे बदल झाले आहेत. हे बदल अजूनही चालू आहेत. वेबबेटा इन्फोनं दिलेल्या वृत्तानुसार चॅट बबल पूर्णपणे बदलण्याच्या विचारात आहे.
Whatsappच्या या नवीन अपडेटनंतर, युझर्सना त्यांच्या चॅट बॉक्समध्ये चॅट बबल बदललेले दिसेल. व्हॉट्सअॅप चॅट बबलला आतापेक्षा थोडा मोठा तयार करण्यात आला आहे. त्याच्या बॅगराऊंडचा रंगही बदलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
सर्वात पहिल्यांदा हे अपडेट iOS बीटा युझर्सना मिळणार आहे. तर बबल चॅट अपडेट अॅण्ड्रॉइड युझर्सना मिळू शकतं. काही स्मार्टफोन्समध्ये हे अपडेट देखील आलं आहे. आता ios युझर्सना हे अपडेट मिळणार आहे. या अपडेटबाबत व्हॉट्सअॅपने सध्यातरी कोणतीही अधिक माहिती दिली नाही. हे अपडेट व्हॉट्सअॅप युझर्सच्या स्मार्टफोन्सवर लवकरच उपलब्ध होईल. सध्या, या चॅट बबल फीचरची चाचणी सुरू आहे. हे अपडेट यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतरच लोकांसाठी रिलीज केले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
व्यू वन्स फीचर, वीडियो कॉल याशिवाय ऑडिओ मेसेजमध्ये देखील अनेक बदल करण्यात आले आहेत. याशिवाय एन्ड टू एन्ड सब्स्क्रिप्शन अधिक सुरक्षित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता हे नवीन फीचर कधी येणार याची प्रतीक्षा युझर्सना लागली आहे.