Uber Intercity Service: उबरने एक नवीन फिचर लाँच केले आहे. ज्यामुळं तुम्ही आधी बुक केलेल्या कार आणि ड्रायव्हरसह एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करु शकता. हे फिचर राउंड ट्रिप यात्रेसाठी आहे. यात ग्राहक पाच दिवसांची ट्रिप बुक करु शकता. जे लोक लांबचा प्रवास करतात आण एकच कार आणि ड्रायव्हरसह आरामात प्रवास करु इच्छितात त्यांच्यासाठी हे फिचर खूप उपयुक्त आहे. यामुळं एकदा कार बुक केल्यावर तुम्ही अनेक ठिकाणी जाऊ शकतात.
उबरने देशातील सर्व शहरांत ही नवीन सुविधा सुरू केली आहे. यावेळी लोकांना एकच कार आणि ड्रायव्हरसोबत पाच दिवसांचा प्रवास सलग करु शकता. या सुविधेचे नाव उबर राऊंड ट्रिप असून बिझनेस आणि खासगी या दोन्ही प्रकारच्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.
उबरने त्यांच्या प्रवाशांना 90 दिवस आधी राउंड ट्रिप बुक करण्याची परवानगी दिली आहे. दुसऱ्या राज्यात किंवा शहरात फिरायला जात असणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा खूप उपयुक्त आहे. लांबच्या प्रवासाला निघताना अनोळखी ठिकाणी हरवण्याची किंवा दगाफटका होण्याची भीती असते अशावेळी उबरच्या या सुविधेमुळं ग्राहक निश्चिंत होऊन प्रवास करु शकतात.
उबरच्या न्यू मोबिलिटी विभागाच्या प्रमुख श्वेता मंत्री यांनी म्हटलं आहे की, लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा खूप फायद्याची ठरणार आहे. यामुळं प्रवाशांना मदत होणार आहे. त्याचबरोबर त्यांच्याजवळ विश्वासार्ह वाहन आणि ड्रायव्हर असल्याने त्यांचा प्रवास खूप सोप्पा होणार आहे.
- तुमच्या उबर अॅपमध्ये असलेल्या पर्यायांमध्ये इंटरसिटी या पर्यायावर क्लिक करा.
- राउंड ट्रिप निवडा आणि तुमचे डेस्टिनेशन दाखल करा
- तुम्हाला लगेचच कारची गरज असेल तर Now हा पर्याय निवडा. अन्यथा रिझर्व्ह हा पर्याय निवडून तुम्ही नंतर कार बुक करु शकता.
- पिकअप डेट, वेळ आणि ड्रॉपची तारीख आणि वेळ एकत्रच टाका
- तुम्हाला कोणत्या कारमधून प्रवास करायचा आहे ती कार निवडा
- एकदा तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थित आहे की चेक करा आणि तुमची राउंड ट्रिप बुक करु शकता.