सॅमसंगने भारतात लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन

29 जुलैपासून सॅमसंगच्या ई-स्टोअरसह इतर विक्रेत्यांकडून खरेदी करता येणार हा फोन

Updated: Jul 27, 2020, 07:28 PM IST
सॅमसंगने भारतात लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन title=

मुंबई : दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी एम ०१ कोर भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 5,499 रुपये ठेवण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी M01 कोअर दोन व्हेरिएंटमध्ये भारतात लॉन्च करण्यात आला आहे. 1 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 5,499 रुपये आहे. दुसर्‍या व्हेरिएंटमध्ये 2 जीबी रॅम 32 जीबी स्टोरेज देण्यात आला असून त्याची किंमत 6,499 रुपये आहे.

हे दोन्ही प्रकार ब्लॅक, ब्लू आणि रेड कलरमध्ये उपलब्ध असतील. 29 जुलैपासून सॅमसंगच्या ई-स्टोअरसह इतर विक्रेत्यांकडून खरेदी करता येईल.

गॅलेक्सी M01 कोअरमध्ये 5.3 इंचाची एचडी + टीएफटी डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड गो बेस्ड सॅमसंगच्या कस्टम वनूआयआयवर चालतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 6739 प्रोसेसर आहे, जो क्वाडकोर आहे.

गॅलेक्सी M01 कोअरमध्ये फोटोग्राफीसाठी 8-मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आहे. यात एलईडी फ्लॅशसुद्धा आहे. सेल्फीसाठी यात 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

गॅलेक्सी M01 कोअरची बॅटरी 3,000 एमएएचची असून यात मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट देखील आहे. याशिवाय हेडफोन जॅक, वायफाय, ब्लूटूथ आणि जीपीएस सारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. यात मायक्रो यूएसबी पोर्ट आहे.