Redmi 13C: Redmi च्या चाहत्यांसाठी लवकरच एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेडमी एक नवीन स्मार्टफोन लाँच करत आहेत. एका ग्लोबल इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात येत आहे. भारतासह जगभरात 13C लाँच करण्यात येणार आहे. 6 डिसेंबर रोजी याची लाँचिंग डेट असल्याचे समोर येत आहे. या स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि सर्वकाही जाणून घेऊया. (Redmi 13C Launch And Price)
एका रिपोर्टनुसार, Redmi 13C दोन रंगात लाँच करण्यात येत आहे. स्टाडस्ट ब्लॅक आणि स्टार शाइन ग्रीन हे दोन पर्याय असणार आहेत. Redmi च्या ऑफिशियल वेबसाइटनसार, Redmi 13C स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल एआय कॅमेऱ्या सेंसरसोबत येणार आहे. तर, फोनमध्ये एकूण तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत.
कंपनीचा दावा आहे की, Redmi 13C हा एक फीचर लोडेड अफोर्डेबल स्मार्टफोन असेल. तर, या स्मार्टफोनच्या तुलनेत बाजारात सध्या कोणताच स्मार्टफोन आत्ताच्या घडीला उपलब्ध नाहीये. ज्यात इतके फिचर्स असतील. हा एक फ्युचर रेडी स्मार्टफोन असेल. ज्यात ड्युल 5G स्टँडबाय सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. कर 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.
Xiaomi Global वेवसाइटच्या मते, Remdi 13C स्मार्टफोनमध्ये 6.74 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. जे 90HZ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्गिंजला सपोर्ट करते. फोनच्या सुरक्षेबाबत बोलायचे झाल्यास, फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास सपोर्टसाठी देण्यात आला आहे. तसंच, प्रोसेसरबाबत बोलायचे झाल्यास, Mediatek Helio G85 सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 16 जीबी रॅम सपोर्ट देण्यात आला आहे.
Unveiling the all-new #Redmi13C in a captivating #StarShineDesign, infusing the cosmos into your palm.
Get ready to witness this cosmic beauty with the perfect blend of innovation.
Launching on 6th December 2023.
Know more: https://t.co/UntV8tJCLx pic.twitter.com/H7KFHmTmZY
— Redmi India (@RedmiIndia) November 27, 2023
लीक रिपोर्टनुसार, फोनची किंमत 10 ते 15 हजार रुपयांच्या प्राइस पॉइंटमध्ये लाँच केले जाऊ शकते.