Netflix, Amazon Prime, Hotstar वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी

ही गोष्ट तुम्ही केली नसेल तर आजच करा नाहीतर 1 ऑक्टोबरपासून तुमची Netflix, Amazon Prime, Hotstar सेवा बंद होणार

Updated: Sep 29, 2021, 07:18 PM IST
Netflix, Amazon Prime, Hotstar वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी title=

मुंबई: तुम्ही जर ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरिज पाहात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. Netflix, Amazon Prime, Hotstar या पैकी कोणतंही अॅप तुमच्याकडे असेल आणि तुम्ही ते वापरत असाल तर यासंदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. RBI च्या बदलेला नियम तुम्ही वाचला नसेल तर आजच जाणून घ्या. नाहीतर तुमची  Netflix, Amazon Prime, Hotstar ही सेवा बंद होऊ शकते. आता RBI आणि या सेवांचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडणं सहाजिक आहे. 

Netflix, Amazon Prime, Hotstar या सर्वांसाठी पेमेंट प्रक्रिया ही डेबिट कार्ड, UPI किंवा क्रेडिट कार्डद्वारे केली जाते. यामध्ये अनेकजण ऑटो पे हा पर्याय निवडतात किंवा अनेकांनी हा पर्याय निवडलाही असेल. RBI ने Auto pay संदर्भातील नियमात बदल केला आहे. हा नवा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे तुम्हीही ऑटो पे पर्याय या अॅपसाठी निवडला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 

RBI च्या नव्या नियमानुसार आता या अॅपसाठी ऑटो पेमेंट हा पर्याय बंद करण्यात आला आहे. या अॅपसाठी ऑटो पेमेंट होणार नाही. ऑटो पेमेंट सेवा वापरणाऱ्यांनी नवीन नियम जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही जर रिचार्ज करायला विसरालात तर तुमची सेवा तत्काळ बंद होऊ शकते. तुम्ही रिचार्ज केला नाही तर OTT प्लॅटफॉर्म काम करणे बंद होऊ शकतो. 1 ऑक्टोबर 2021 पासून RBI चे नवीन नियम देशभरात लागू करण्यात येणार आहे. 

1 ऑक्टोबरपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) आदेशामुळे ऑटो पेमेंट सेवा बंद केली जात आहे. आरबीआयने अशी पेमेंट करण्यासाठी अतिरिक्त एएफए अर्थात अॅडिशन फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रक्रिया जोडली आहे. अशा परिस्थितीत, ऑटो पेमेंट सेवा वापरणाऱ्यांनी नवीन नियम जाणून घेणे महत्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही रिचार्ज चुकवू नका. अन्यथा तुमचे OTT प्लॅटफॉर्म काम करणे बंद करतील. 1 ऑक्टोबर 2021 पासून RBI चे नवीन नियम देशभरात लागू केले जात आहेत.

RBIच्या नव्या नियमानुसार ऑटो पेमेंटपूर्वी अॅडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशन करावं लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला ऑटो पेमेंटची कल्पना बँकेकडून ग्राहकांना दिली जाणार आहे. ऑटो पेमेंट करण्यापूर्वी, तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म आणि बँकेद्वारे ऑटो पेमेंटबद्दल माहिती दिली जाईल. जर तुम्हाला रिचार्ज चालू ठेवायचे असेल तर तुम्हाला ऑटो पेमेंटला परवानगी द्यावी लागेल.

AFA नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार होता. पण, नंतर RBI ने त्याला 6 महिन्यांची सूट दिली होती. हा नवा नियम आता 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर ही परवानगी दिली नसेल तर आजच द्या. अथवा रिचार्ज करायला विसरू नका. नाहीतर तुम्हाला ऑटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेता येणार नाही. त्यामुळे ही गोष्ट नक्की 1 ऑक्टोबरपूर्वी करा.