अ‍मेझॉनवर अवघ्या काही तासात सोल्ड आऊट झाली ही SUV कार

फोर्डची इको स्पोर्ट या नव्या कारने लॉन्चच्या आधीच नवा विक्रम केला आहे.

Updated: Nov 6, 2017, 04:14 PM IST
अ‍मेझॉनवर अवघ्या काही तासात सोल्ड आऊट झाली ही SUV कार  title=

 मुंबई : फोर्डची इको स्पोर्ट या नव्या कारने लॉन्चच्या आधीच नवा विक्रम केला आहे.

ग्राहकांच्या आवडीच्या नव्या १२३ एसव्हीयू कारसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू झाले होते. मात्र अल्पावधीतच या कारने कामाल केली. 

 फोर्ड इको स्पोर्टच्या काही लिमिटेड एडिशन बाजारात आणल्या आहेत. अमेझॉनवर ज्या कारची ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आली होती.  ५ नोव्हेंबरला रात्री ही ऑफर सुरू झाली. १२३ कार्ससाठी सकाळी १० वाजेपर्यंत बुकिंग सुरू होतं. केवळ १०,००० रूपयांच्या डिपॉजिटवर ही कार बुक करता येऊ शकते. इकोस्पोर्ट ही भारतातील सक्षम,कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे. 
 
 अमेझॉनवर ग्राहकांनी इकोस्पोर्टला उदंड प्रतिसाद दिला.  यावरूनच आम्हांला कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार आणि त्यासाठी आकारलेले पैसे हे गणित उत्तम जमल्याचं तसेच ग्राहकांचे आमच्यावरील विश्वासाची पावती मिळाली आहे. या कारमध्ये आम्ही दिलेल्या सोयी ग्राहकांना आवडतील असा आमचा विश्वास असल्याची माहिती फोर्ड  इंडियाचे मार्केटिंग उपाध्यक्ष राहुल गौतम यांनी दिले आहे. 
 
  या कार्सची वैशिष्ट्य 

 सहा स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन 
 १.५ लीटर पेट्रोल इंजिन सोबत ३ सिलेंडर 
  टाइटेनियम प्लस ट्रिम टॉप वेरिएंट
  किमी प्रति लीटरचे उत्कृष्ट माइलेज 
 सहा एअर बॅग्स 
 सिंक 3 मध्ये हाय-रिजॉल्यूशन वाले ८ इंचाचे फ्लोटिंग टच स्क्रिन 
 अ‍ॅपल कार प्ले आणि अ‍ॅन्ड्रॉईडला कनेक्ट होणारी सुविधा